madan patil news : मदनभाऊ गटाची राजकीय दिशा ठरणार: जयश्रीताईंनी बोलवली बैठक

SHARE:

madan patil news : मदनभाऊ गटाची राजकीय दिशा ठरणार: जयश्रीताईंनी बोलवली बैठक : सांगली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने बंडखोरी केलेल्या जयश्रीताई पाटील यांना पक्षाने निलंबित केले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीसाठी मदनभाऊ पाटील गटाची राजकीय दिशा ठरविण्यासाठी बुधवारी कळंबी (ता. मिरज) येथे कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.

madan patil news : मदनभाऊ गटाची राजकीय दिशा ठरणार: जयश्रीताईंनी बोलवली बैठक

सांगली विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छूक होत्या. मात्र काँग्रेस पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्याने जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केली होती. खा. विशाल पाटील, काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्यासह पक्षाच अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात होते. त्यामुळे जयश्रीताई पाटील यांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर येत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जयश्रीताई पाटील यांना ऑफर दिली होती. मात्र त्यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला नव्हता.

स्व. मदनभाऊ पाटील यांची जयंती दि. 2 डिसेंबरला झाली. त्यावेळी त्यांनी योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते. पण विधानसभा निवडणुकीपासून ते अनेक राजकीय कार्यक्रमांपासून अलिप्त होते. तर दोन महिन्यापूर्वी आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांचे निलंबन रद्द करून त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्या निर्णयाला विरोध करत प्रदेश काँग्रेसकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांचा स्वगृही परतण्याचा निर्णय बारगळला होता.

Madanbhau group’s political direction will be decided: Jayashreetai calls meeting

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मदनभाऊ पाटील गटाचा अस्तित्व ठेवण्यासाठी राजकीय निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. बुधवारी दुपारी चार वाजता कळंबी येथील मदनभाऊ पाटील यांच्या फार्महाऊसवर ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मदनभाऊ पाटील समर्थकांना निरोप देण्यात आले आहेत. जयश्रीताई पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पक्षाकडून ऑफर देण्यात येत आहेत. त्यामुळे या बैठकीत कार्यकर्ते कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *