rajkiyalive

SANGLI MURDAR : खंडेराजुरीत वरातीमध्ये नाचत असताना युवकाला भोसकले; जागीच मृत्यू

मिरज /प्रतिनिधी

SANGLI MURDAR : खंडेराजुरीत वरातीमध्ये नाचत असताना युवकाला भोसकले; जागीच मृत्यू : मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील सुमित जयंत कांबळे (वय 21) याचा वरातीमध्ये नाचक असताना किरकोळ कारणावरून सुरज सचिन आठवले व त्याच्या साथीदारांनी नाचतानाच पोटात व छातीवर चाकूने भोसकून खून केला.
खंडेराजुरीत खून झाल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल त्यातील सुरज सचिन आठवले व अतुल वायदंडे या दोघांना अटक केल असून दोघे फरार असल्याचे समजते.

SANGLI MURDAR : खंडेराजुरीत वरातीमध्ये नाचत असताना युवकाला भोसकले; जागीच मृत्यू

अतुल वायदंडे व सुरज आठवले यांच्याबरोबर सुमित कांबळे याचा रंगपंचमीदिवशी रंगलावण्याच्या वादातून वाद झाला होता. त्यावेळी हा वाद मिटविण्यात आला होतां. परंतु त्या वादाची खदखद अजूनही त्याचा पर्यावसन काल वरातीमध्ये सुमित कांबळे नाचत होता. त्या वरातीमध्ये अतुल वायदंडे व सुरज आठवले नाचत होता.

त्यावेळी परत सुमित कांबळे व सुरज आठवले यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. याचे पर्यावसन जोरदार हाणामारी झाली. सुमित कांबळे व सुरज आठवले यांनी सुमित कांबळे यास धारदार चाकूने आणि जॅबियाने भोसकले. सुमित कांबळे हा जागेवरच कोसळला.

डिजेच्या आवाजावर सर्वजण थिरकले होते. अचानक सुमित कांबळे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली. वरातीमध्ये खून झालाल्याची माहिती मिळताच. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरज आठवले याच्यासह अतुल वायदंडे, शरद ढोबळे, आकाश या साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

सुमित कांबळे खून हा अतिशय शांत स्वभावाचा होता. तो मिलिटरी भरतीसाठी तयारी करत होता. त्याने मिलिटरी भरतीची परीक्षा पास झाला होता. थोड्याच दिवसात तो मेडिकल साठी जाणार होता त्याचा खून झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सुरज आठवले यांच्याविरूध्द यापूर्वी खूनी हल्ला, चोर्या, दादागिरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. मिरज ग्रामीण पोलिसात सुरज आठवले व त्यांच्या साथीदाराविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज