rajkiyalive

sangli murdar news : सांगलीच्या सरकारी घाटावर महिलेचा निर्घुण खून : चाकूने वार करत चिरला गळा : घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी. 

sangli murdar news : सांगलीच्या सरकारी घाटावर महिलेचा निर्घुण खून : चाकूने वार करत चिरला गळा : घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी.  : सांगली : शहरात दोन दिवसापुर्वी कदमवाडी रस्त्यावर एकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच आज शहरातील आयर्विन पुलाजवळ कौटुंबिक वादातून माहेरी राहणाऱ्या पत्नीचा चाकूने गळा चिरण्यात आला. प्रियांका जकाप्पा चव्हाण (वय २८, रा. सांगलीवाडी) असे तिचे नाव आहे. पती जकाप्पा सोमनाथ चव्हाण (रा. बबलेश्‍वर, जि. विजापूर) याने हा खून केल्याचा संशय असून तो पसार आहे.

sangli murdar news : सांगलीच्या सरकारी घाटावर महिलेचा निर्घुण खून : चाकूने वार करत चिरला गळा : घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी. 

पोलिस आणि घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की, प्रियांका आणि जकाप्पा यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला आहे. दोघेनाही दोन लहान मुले आहेत. एक मुलगा-एक मुलगी आहे. बबलेश्‍वर येथे राहत होते. जकाप्पा हा रत्नागिरी जिल्ह्यात दगडाच्या खाणीवर काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे.
दारूच्या व्यसनातून आणि काम करत नसल्यामुळे दोघांमध्ये वाद होता. या वादातून प्रियांका ही सांगलीवाडी येथे माहेरी आली होती. आई-भावाबरोबर ती राहत होती. तसेच टिळक चौकातील गोकुळ साडी सेंटरमध्ये ती काम करत होती. काल पती जकाप्पा हा तिला भेटायला आला होता. रात्री तेथेच राहिला. सायंकाळी प्रियांकाच्या आईला भेटून बोलून घेतो असे सांगून बाहेर पडला. साडे आठच्या सुमारास काम आटोपल्यानंतर प्रियांका घरी जाण्यासाठी बाहेर पडली.

sangli-murdar-news-brutal-murder-of-a-woman-at-the-government-ghat-of-sangli-throat-slashed-with-a-knife-large-crowd-of-onlookers-at-the-scene

तेव्हा पती जकाप्पा याने तिला गाठले. तिला बोलण्यासाठी म्हणून सरकारी घाटावर आणले. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर जकाप्पा याने तिच्या गळ्यावर चाकूने खोलवर वार केला. ती गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर तो तिथून पळून गेला. प्रियांका घरी आली नाही म्हणून तिची आई व भाऊ शोध घेत सांगलीत आले. त्यांनी प्रियांकाला कॉल केला, परंतू ती फोन उचलत नव्हती. त्यामुळे जकाप्पाला फोन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा फोन स्वीच ऑफ लागला. काही वेळाने त्याचा फोन लागला. फोन उचलल्यानंतर त्याने तरूण भारत क्रीडांगणाजवळ असल्याचे सांगितले.
तेथे जाऊन शोध घेतल्यानंतर तो सापडला नाही. त्यामुळे परत शोधाशोध करत असताना आयर्विन पुलाखाली प्रियांकाचा मृतदेह आढळला. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक संजय मोरे पथकासह घटनास्थळी आले. खूनानंतर आयर्विन पुलावर व घाटावर गर्दी झाली होती. वाहतूक पोलिस व शहर पोलिसांनी गर्दी हटवली. त्यानंतर पंचनामा केला. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज