rajkiyalive

sangli news : माजी महापौर, उपमहापौरांसह 19 माजी नगरसेवक सोडणार काँग्रेसची साथ

sangli news : माजी महापौर, उपमहापौरांसह 19 माजी नगरसेवक सोडणार काँग्रेसची साथ : महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे माजी दोन महापौर, माजी दोन उपमहापौर यांच्यासह 19 माजी नगरसेवक पक्षाची साथ सोडणार असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. यामध्ये खासदार विशाल पाटील व जयश्रीताई पाटील समर्थकांचा समावेश आहे. निवडणुकीपूर्वी हे पदाधिकारी भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार आहे.

sangli news : माजी महापौर, उपमहापौरांसह 19 माजी नगरसेवक सोडणार काँग्रेसची साथ

खासदार व जयश्रीताई पाटील समर्थकांचा समावेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात होणार आहेत. सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेची निवडणूक देखील तोंडावर आहेत. त्यामुळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने खा. विशाल पाटील यांची उमेदवारी डावलली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. काँग्रेससह इतर पक्षांनी त्यांना साथ दिली आणि निवडून आले. तर दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. जयश्रीताई पाटील अपक्ष लढल्या, मात्र त्यांचा पराभव झाला.

काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

त्यामुळे खा. विशाल पाटील व जयश्रीताई पाटील समर्थक माजी नगरसेवक देखील आता काँग्रेसवर नाराज आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दादा घराण्याच्या बाजुने असलेले माजी नगरसेवक आता काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच जयश्रीताई पाटील यांनी काही तीन दिवसांपूर्वी समर्थकांची बैठक घेतली होती. या बैठकीला माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक जण उपस्थित होते. या बैठकीत माजी महापौर, उपमहापौर यांच्यासह 19 नगरसेवकांनी काँग्रेस सोडावी, असा आग्रह त्यांच्याकडे धरला होता. काँग्रेस पक्षाकडून सतत अन्याय होत असेल तर काँग्रेस सोडलेली बरी, असा त्यांचा सूर आहे. येत्या आठ दिवसात याबाबतचा निर्णय घ्यावा, असे मत देखील जयश्रीताई पाटील यांच्याकडे व्यक्त केले गेले आहे.

माजी महापौर कांचन कांबळे, किशोर शहा, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, प्रशांत पाटील, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, प्रदीप पाटील, मृणाल पाटील यांच्यासह 19 माजी नगरसेवक काँग्रेस पक्षाची साथ सोडणार आहेत. तर दुसरीकडे खा. विशाल पाटील समर्थक युवा पदाधिकारी, एक माजी नगरसेविका देखील काँग्रेस सोडणार आहे. काँग्रेसमध्ये होत असलेल्या अन्यायामुळे पक्ष सोडणार आहेत. जयश्रीताई पाटील व माजी नगरसेवकांवर भाजप पक्षाने गळ टाकला आहे. त्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गटाने देखील पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. निवडणुकीची रणधुमाळी आता लवकरच सुरू होणार आहे. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर होण्यापूर्वी हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा माजी नगरसेवकांची बैठक होणार आहे.

काँग्रेसची मदार आता आ. विश्वजीत कदमांवर…

महापालिका क्षेत्रातील काँग्रेसचा मोठा गट पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची मदार आता आ. विश्वजीत कदम यांच्यावर असणार आहेत. आ. विश्वजीत कदम समर्थक असलेले काँग्रेसचे माजी पाच नगरसेवक काँग्रेसमध्ये राहणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी आ. विश्वजीत कदम यांना नव्या दमाच्या कार्यकर्त्याला आता संधी द्यावी लागणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज