sangli news : जिल्हा नियोजनसह 37 समित्यांकडे इच्छुकांचे लक्ष

SHARE:

sangli news : जिल्हा नियोजनसह 37 समित्यांकडे इच्छुकांचे लक्ष : गेल्या काही महिन्यापासून प्रलंबीत असणार्‍या जिल्हा नियोजन समितीसह अन्य 37 समित्यांकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. या समित्यांवर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी वरिष्ठांना साकडे घालण्यास सुरवात केली आहे. पक्षांतर्गत स्पर्धा लक्षात घेता थेट मुंबई वार्‍या सुरु केल्या आहेत. दरम्यान जून अखेरपर्यंत जिल्हा नियोजनसह सर्वच शासकिय समित्यांवर अशासकिय सदस्यांच्या नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुशंगाने हालचाली गतीमान झाल्या आहेत.

sangli news : जिल्हा नियोजनसह 37 समित्यांकडे इच्छुकांचे लक्ष

वरिष्ठांकडे लॉबिंग ः वर्णी लागण्यासाठी मुंबईच्या वार्‍या

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन सहा ते सात महिन्याचा कालावधी लोटला आहे. तरीही जिल्हा नियोजन समितीसह अन्य शासकिय समित्या तयार झालेल्या नाहीत. विशेषतः जिल्हा नियोजन, दिशा, संजय गांधी निराधार, शांतता कमिटीसह अन्य समित्यांवर वर्णी लागावी यासाठी राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते. शासनाच्या विविध विभागांच्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय समित्या असतात. या समित्यांत अशासकिय सदस्यांचाही समावेश असतो. कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून तर कधी कार्यकर्त्यांचे राजकिय पुनर्वसन या समित्यांच्या माध्यमातून केले जाते.

सांगली जिल्ह्यात जिल्हा नियोजनसह तब्बल 37 जिल्हा व 7 तालुकास्तरीय समित्या आहेत. या समित्या कधी गठीत होतात याकडे इच्छुक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. यासाठी वरिष्ठ नेत्यांना साकडे घालण्यात येत आहे. काही समित्यांचे पालकमंत्री अध्यक्ष असतात, तर काहींचेे जिल्हाधिकार्‍यांसह अन्य अधिकारी अध्यक्ष असतात. विशेषतः जिल्हा नियोजन समितीकडे अनेकांचा कल असतो. जिल्ह्याच्या नियोजनात लोकप्रतिनिधींच्या बरोबर या समितीत स्थान मिळत असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजन मध्ये वर्णी लागावी यासाठी देव पाण्यात घातले आहेत. नगरपालिका, महापालिका, जिल्हापरिषदेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे या संस्थामधील सदस्यांच्या जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे अशासकिय सदस्यांना चांगले दिवस येणार आहेत.

sangli-news-attention-of-aspirants-to-37-committees-including-district-planning

दरम्यान सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. पक्षांतर्गत स्पर्धा पाहता इच्छुकांनी लॉबिंग सुरु केले आहे. यासाठी थेट मुंबई गाठत वरिष्ठ नेत्यांना साकडे घातले जात आहे. सत्ताधारी आमदारांच्या संख्येनुसार पॅार्म्युले तयार केले जात आहेत. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी असे सूत्र तयार केले जात आहे. जिल्ह्यात प्रत्येक विभागाकडे कोणत्या समित्या आहेत. त्यांची रचना, त्यावरील अशासकिय सदस्यांची संख्या आदीबांबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून प्रशासनाकडे माहिती मागविल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांकडून समित्यांवर वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुुर आहेत.

महत्वाच्या जिल्हास्तरीय समित्या अशा

जिल्हा नियोजन समिती, दक्षता समिती, जिल्हा होमगार्ड समिती, जिल्हा शांतता समिती, हुतात्मा समिती, जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती, जिल्हा स्तरीय रोजगार हमी समिती, सर्वशिक्षा अभियान समिती, जिल्हा पर्यावरण समिती, महिला सल्लागार समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, प्राणीक्लेश प्रतिबंध समिती, अनुदानित वसतीगृह निरीक्षण समिती, वृध्द कलावंत मानधन वाटप समिती, जिल्हा स्तरीय आत्मा समिती, संजय गांधी योजना समिती, जिल्हा अपंग कल्याण समिती, मुद्रा योजना समन्वय समिती आदी.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *