sangli news : बांग्लादेशी आणि रोहिंग्याची हकालपट्टी करा, अन्यथा शोधमोहीम राबवू : नितीन शिंदे यांचा इशारा

SHARE:

sangli news : बांग्लादेशी आणि रोहिंग्याची हकालपट्टी करा, अन्यथा शोधमोहीम राबवू : नितीन शिंदे यांचा इशारा : बांगलादेशी आणि रोहिंग्याची देशात घुसखोरी वाढली आहे त्यांचा शोध घेऊन त्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा आम्ही ही शोधमोहीम हातात घेऊन त्यांना शोधून काढू, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी मोर्चावेळी दिला

sangli news : बांग्लादेशी आणि रोहिंग्याची हकालपट्टी करा, अन्यथा शोधमोहीम राबवू : नितीन शिंदे यांचा इशारा

जिल्ह्यात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवा, या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनच्यावतीने राममंदिर चौकातून मोर्चा काढण्यात आला. पंचमुखी मारुती रोडवरून हा मोर्चा मारुती चौकात आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मोर्चात योगी बाळ महाराज, हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, इस्कॉनचे मस्त्य अवतारदास, भाजपाचे नेते श्रीकांत शिंदे, माजी नगरसेविका स्वाती शिंदे आदी सहभागी झाले होते.

योगी बाळ महाराज म्हणाले, बांगलादेशातील हिंदूंवर गेल्या सात-आठ महिन्यांपासून अत्याचार सुरू आहेत. मात्र आपले लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. हीच परिस्थिती राहिली तर जे बांगलादेशात होतेय ते इथे होण्यास वेळ लागणार नाही. धर्मांतर हे देशांतर आहे. भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर वेळीच जागे व्हा, असा इशाराही त्यांनी दिला.

हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले, बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी कृष्णदास पुजारी यांना गेली दोन महिने तुरुंगात ठेवले आहे. केंद्र सरकारने त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. वेळ पडल्यास बांगलादेशात लष्कर घुसवा, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, राज्यात निवडून आलेले महायुतीचे 232 आमदार हे फक्त लाडकी बहिणीमुळे नसून हिंदुत्वाच्या लाटेमुळे आले आहेत. मात्र अधिवेशनात एकाही आमदाराने बांगलादेशातील हिंदूंसाठी तोंड उघडले नाही. बांगलादेशात हिंदू महिलांवर अत्याचार होत असताना इकडचा हिंदू गप्प का असा सवाल त्यांनी केला. जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून बाहेर काढा अन्यथा हिंदू एकताचे कार्यकर्ते त्यांना शोधून पोलिसांच्या ताब्यात देतील असा इशारा त्यांनी दिला.

इस्कॉनचे मस्त्य अवतारदास म्हणाले, बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत आहेत. मंदिरांवर हल्ले होत आहेत. हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले जात आहेत.त्यामुळे भारत सरकारने बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेला अत्याचार रोखण्यासाठी लष्करी कारवाई करावी आणि हिंदूंचे रक्षण करावे अशी मागणीही त्यांनी केली. सतीश खांबे, प्रकाश निकम, भूषण गुरव, भाजपाचे पदाधिकारी अविनाश मोहिते आदी सहभागी झाले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *