rajkiyalive

SANGLI LOKSABHA : विलासराव जगताप यांचे राजीनामा अद्यापही नामंजूरच

SANGLI LOKSABHA : विलासराव जगताप यांचे राजीनामा अद्यापही नामंजूरच : भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात उघड उघड बंडं करत खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार करणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे पाठवून दिला. मात्र त्यांचा राजीनामा अध्यापि मंजूर झाला नसल्यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

SANGLI LOKSABHA : विलासराव जगताप यांचे राजीनामा अद्यापही नामंजूरच

लोकसभा निवडणुकीत लोकसभेचा उमेदवार बदला असे आग्रही मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली होती. मात्र पक्षाने पुन्हा संजयकाका पाटील यांच्या पारड्यात वजन टाकत त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे माजी आमदार विलास जगताप हे कमालीचे नाराज झाले. विधानसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांनी माझ्याशी गद्दारी केली आहे .असा त्यांनी आरोप केला होता.

विलासराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा यांना पाठिंबा दिला

पक्षाने उमेदवार न बदलल्यामुळे माजी आमदार विलासराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा यांना पाठिंबा दिला व दुष्काळी फोरमची मोट त्यांनी बांधली. माजी मंत्री अजितराव घोरपडे व दुष्काळी फोरमची मोट बांधून त्यांनी विशाल पाटील यांचा जोमाने प्रचार केला. व दुष्काळी फोरमचे नेते अप्रत्यक्षरीत्या विशाल पाटील यांना पाठिंबा दिला.

अपक्ष उमेदवार विशाल पाटील हेच निवडुन येणार कोणीही पैज लावा असे जाहीर आव्हान त्यांनी केले.

भाजपचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत व युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप यांची हकालपट्टी करण्यात आली.मात्र माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला होता. मात्र पक्षाने अदायापही मंजूर न केल्यामुळे एकंदरीत उलट सुलट चर्चेला उधाण आहे.

आमदार गोपीचंद पडळकर एक जून पासून करणार जत तालुक्याचा संपर्क दौरा

आमदार गोपीचंद पडळकर हे एक जून पासून जत तालुक्याचा संपर्क दौरा करणार असून. जिल्हा परिषद गटानुसार हा संपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून. त्याचबरोबर त्यांनी जत तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.

जत तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

जत तालुक्यात त्यांचा सतत दौरा चर्चेचा बनला असून .जत तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर निवडणूक लढवण्याची शक्यता जास्त असून. त्यांच्या समर्थकांनी स्टेटसला आमदार गोपीचंद पडळकर यांचा जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे फिक्स असे स्टेटस ठेवल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे .

लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार संजय काका पाटील यांचा जोमाने प्रचार केला .

तसेच जत तालुक्याच्या विविध प्रश्नसंबंधी विधान परिषदेने आवाज उठवला आहे .त्याचबरोबर लवकरच जय शहरात संपर्क कार्यालय सुरू करणार असून. या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील खास व्यक्ती असून .त्यांचें कार्यकर्ते खाजगीत शेठ ना देवेंद्र फडणीस यांनी जात विधानसभे चे तिकीट देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगत आहेत.

त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांचा एक जून पासून संपर्क दौरा आयोजित केला असल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज