rajkiyalive

tasgaon -kavtemankhal vidhansabha 2024 : तासगाव -कवठेमहांकाळमधून घोरपडेच : विशाल पाटील

जनप्रवास तासगाव:

tasgaon -kavtemankhal vidhansabha 2024 : तासगाव -कवठेमहांकाळमधून घोरपडेच : विशाल पाटील लोकसभा निवडणुकीसाठी अजितराव घोरपडेंशिवाय पर्याय नव्हता तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठीही घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केले. तसेच संजय काकांनाही गाडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ते तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते. दरम्यान खानापूर आटपाडी मतदार संघांतून सुहास बाबर यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय काही दिवसापूर्वी विशाल पाटलांनी घेतली होती. आता तासगाव कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडेंना निवडून आणण्याचा त्यांनी निर्धार केेल्याने महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

tasgaon -kavtemankhal vidhansabha 2024 : तासगाव -कवठेमहांकाळमधून घोरपडेच : विशाल पाटील

यावेळी विशाल पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूक लढली. अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नव्हता तसे विधानसभा निवडणुकीलाही अजितराव घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही. संजयकाकांना आता कायमचे गाडायचे असून, हा राक्षस पुन्हा वर येऊ द्यायचे नाही असे त्यांनी सांगितले. या रावणाची लंका जाळायची जबाबदारी लोकसभेला अजितराव घोरपडे यांनी घेतली त्यांनी शब्द देऊन जाहीर भूमिका घेतली. त्यामुळे त्याची जाणीव ठेवणारा हा विशाल पाटील असून, या प्रेमाचा परतावा वसंतदादा घराण्याला कसा करायचा ते कळतो, असे त्यांनी सांगितले.

माजी खासदार दहा वर्षात बोलले तेवढे मी एका शपथविधीला बोललो असे सांगत त्यांनी सारे देव पाण्यात घातले पण एक ही देव यावेळी त्यांना पावला नाही असे ते म्हणाले. अजितराव घोरपडे म्हणाले की तुम्हा सर्वांच्या सहकार्याने खासदार बदलले. ही मोहीम यशस्वी झाली. संसदेतील भाषण बघून माझी निवड किती योग्य होते हे लोकांच्या लक्षात आले. पण ही संधी यायला दहा वर्षे वाया गेली. आमचाच खासदार व आमचाच आमदार या गोष्टीने मतदारसंघाचे वाटोळ झाला आहे, असे सांगत जिल्ह्यात एक वेगळी संघटना उभी करणार असून, विशाल पर्व सुरू करूया असे त्यांनी सांगितले

युवकनेते स्वप्नील पाटील म्हणाले, या शेतकरी मेळाव्यासाठी खासदार येणार का? यावर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. द्राक्ष पट्ट्यात द्राक्षाला भाव नाही, शेतीच्या अन्य प्रश्नांनी शेतकरी भिकेला लागायची वेळ आली आहे. मात्र येथील आमदार, माजी खासदार कधी त्यावर बोलले नाहीत. अनुकंपा सारख्या आमदारकींच्या खिरापती वाटण्याचे काम सुरू असून स्वर्गीय आर.आर.आबा हेच घराणेशाहीचे खरे विरोधक होते. घोरपडे सरकारांनी उभं राहावं तासगावची खिंड आम्ही लढवू असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रताप नाना पाटील यांनी गेल्या दहा वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडले गेले नाहीत. ते प्रश्न एका अधिवेशनात आम्ही विशाल दादांच्याकडून ऐकले. परिवर्तन करून मतदार संघाचा विकास करूया सेटलमेंटचे राजकारण आता थांबवूया असे त्यांनी सांगितले.
स्वाभिमानीचे महेश खरडे यांनी आमदारकी आता कोंगनोळीला नेऊया, चिंचणी व अंजनीने या मतदार संघाला फसवले असून आबा गटाने फसवले तर काका गटाने लुबाडले असे सांगत तालुका या दोन्ही घराण्यातून मुक्त करा, असे सांगितले.

पांडुरंग पाटील म्हणाले की विशाल पाटील यांच्या निवडणुकीत कुरघोड्या करणारा राष्ट्रवादीचा तो नेता अविश्वासु आहे. लोकसभेला त्यांना बेधडक मदत अजितराव घोरपडे सरकारांनी केली आहे. आता खासदाररांनी येत्या विधानसभेला मदत करावी. संजयकाका धोका देऊन शिकार करतात. सुरेश पाटील ताणून मारण्याची भाषा करतात त्यांना उठवून बसवायला दोन माणसे लागतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकसभेला कुरघोड्याचे राजकारण केल्यामुळे विशालदादाना कमी मताधिक्य मिळाले असल्याचे सांगत वडील ग्लुकोज फॅक्टरी सुरु शकले नाहीत आणि पोरगा एम आय डीसीचे गाजर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दाखवत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी किशोर उनउने, दिलीप पाटील, पी डी पाटील, ज्योतीराम जाधव, साहेबराव पाटील ,अरुण खरमाटे, अमित पाटील, महादेव पाटील, आर डी पाटील, पैलवान निवास पाटील, विक्रमसिंह पाटील, अर्जुन थोरात, अनिल पाटील यांचे मान्यवर उपस्थित होते. इंद्रनील पाटील यांनी स्वागत केले.

बैठक राष्ट्रवादीची चर्चा काँग्रेस अध्यक्षाची
तासगाव बाजार समितीत मोठा भ्रष्टाचार झाला असून गेली दोन वर्षे सातत्याने त्या भानगडी आम्ही बाहेर काढत आहे. लोकसभेलाही तुम्ही गद्दारी केली आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष बदलायची चर्चा करता. आमचा पक्ष आहे तुम्ही काळजी करू नका असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील म्हणाले

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज