rajkiyalive

vidhyasagar maharaj : आगम चक्रवर्ती विद्यासागर महाराज

ने.सा. पाटील गुरूजी

vidhyasagar maharaj : आगम चक्रवर्ती विद्यासागर महाराज  आपल्या अमोघ वाणीवर समस्त श्रावकांवर छाप पाडणार्‍या आचार्य सन्मतीसागरजी महाराज यांचे परम शिष्य प. पू. 108 निर्यापक श्रमण विद्यासागरजी महाराज यांना मिरज तालुक्यातील समडोळी येथे आगम चक्रवर्ती ही पदवी प्रदान करण्यात आली. शंभार वर्षापूवीं 1924 च्या दसर्‍यादिवशी समडोळीमध्ये आचार्य शांतीसागर महाराजांना आचार्य ही पदवी देण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच पदवी देण्यात आली.

vidhyasagar maharaj : आगम चक्रवर्ती विद्यासागर महाराज

1924 च्या वर्षायोग अनेक उपक्रमांनी गाजला. त्याचे प्रत्यक्षदर्शी आता कोणी नाही. परंतु त्या उपक्रमांचा वृक्षस्मृतीने या पंचक्रोशीतील श्रावकांनी श्रवण क्रियेने तृप्ती करून घेतली आहे. इ.स. 1890 च्या दरम्यान जन्मलेल्या श्रावकांकडून त्यावेळचा वृत्तांत मौखीक स्वरूपात आम्ही श्रवण केला आहे. त्याच्या आधारे 2024 आणि 2030 या दोन सालामध्ये आचार्य पदारोहण शताब्दी आणि महावीर मंदिर पंचकल्याण पुजा शताब्दी या दोन उपक्रमांचा शताब्दी महामहोत्सव साजरा करायचे ठरवून श्रावकरांनी नियोजनपूर्वक हे दोन्ही नियोजन करायला सुरूवात केली.

त्यानुसार चातुर्मासात मुनी जनांना आमंत्रण देण्याचे ठरवले. पू. विद्यासागर आणि पू.शांतीसागर महाराज यांना आमंत्रित करायचे ठरले. त्याप्रमाणे पू. शांतीसागर महाराज यांच्या कानावर या गोष्टी घातल्या. त्यांनी उत्तरेचा दौरा करून आल्यानंतर आपण रूपरेषा ठरवू असे सांगितले. परंतु दैवी इच्छा निराळीच होती. त्यामुळे आमचे नियोजन फिस्कटले. शेवटी ही सर्व जबाबदारी पू. सन्मतीमहाराजांचे श्री. 108 विद्यासागर महाराजांवर सोपविण्याचे ठरविले. श्री 108 धर्मसागरजी महाराज आणि 108 विद्यासागरजी महाराज यांनी ही जबाबदारी स्वीकारून संमती दिली. त्यांच्या काटेकोर नियोजनाने पावन वर्षायोगाला सुरूवात झाली. आचार्य वर्धमान सागर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षायोगाचे नियोजन केले गेले.

बालयती श्री 108 विद्यासागर महाराज यांचे मूळ गाव माधवनगर, सांगली. संस्थानमधील माधवराव पटवर्धन यांच्या स्मरणार्थ वसलेले गाव, मिरज-पुणे -मुंबई रेल्वे मार्गामुळे एक छोटेशे स्टेशन या गावाचा सर्वांना परिचय होतो. तसे गाव लहान परंतु त्यावर स्टेशन आणि हवेशीर अनेक श्रीमंत लोकांनी आपले घरे बांधून स्थयिक होण्यासाठी प्रयत्नशील होते. जैन दिगंबर आणि श्वेतांबरांनी येथे बंगले तर बांधलेच त्याचबरोबर मंदिरेही बांधली. अशा या छोट्याशा गावात धर्मानुरागी सुनील भुजगोंडा पाटील बिरादार आपली पत्नी सुनितासह सुखी जीवन जगत होते. नित्याची श्रावकांची क्रिया करणे, इमानेइतबार व्यापार करून आपला संसार गाडा चालवत होते. भरतेश मुलगा व सोनली मुलगी आणि विद्याधर अशी संतती होती. आपले चरित्र नायक विद्याधर हे पहिल्यापासूनच विरागीभावी होते. नित्यनियमाने देवदर्शन करणे, साधुंचे वयोवृत्त करणे यात त्यांना गोडी होती.

आचार्य सन्मतीसागर महाराजांचा वर्षायोग सांगली जैन बोडिंर्ंगमध्ये असताना ते माधवनगरहून रोज त्यांची सेवा करण्यासाठी यायचे व त्यांचे प्रवचन ऐकून घरी परत जात होते. यातच त्यांचा परिचय वाढला आणि त्यांनी 2008 साली आजन्म ब्रम्हचारी व्रत घेतले. अनेक धार्मिक ग्रंथ, हिंदी, संस्कृत, मराठी इतर भाषा त्यांनी आत्मसात करून घेतल्या. स्वाध्यायामुळे त्यांच्यात वैराग्याचा अंकुर निर्माण झाला. श्रुतपंचमी 2008 मध्ये त्यांनी मुनी दिक्षा धारण केली. खूप स्वाध्याय करून ज्ञान भांडार भरून घेतले. त्यामुळे त्यांच्याकडे तरूण वर्ग आकर्षित झाला. त्याचा उपयोग तरूणांचा विधायक कार्याकडे वळवुनी बाबासाहेबांचे अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. आचार्य सन्मती महाराजांचा समडोळीला विहार होईल त्यावेळी त्यांची उपस्थिती कायम असणार.

त्यातूनच त्यांचा परिचय झाला. मी मंदिरामध्ये रात्री 6 ते 9 या वेळेत पुराण वाचन करणार त्यावेळी ते श्रोते म्हणून असायचे.मी त्यांना एकेदिवशी पुराण वाचा म्हणून विनंती केली. त्यांनी त्यादिवशी अध्यात्म आणि कथा भागाची सांगड घालत एक तास सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. तेंव्हापासून ज्या ज्या वेळी येतील त्यावेळी त्यांचे पुराण ठेवून सर्व श्रोत्यांना लाभ करून देत असते.

उत्तरेच्या विहारात त्यांनी हिंदी भाषेचा विशेष अभ्यास करून आचार्य विद्यासागर महाराज यांच्या मुकमाटी या ग्रंथांवर युट्यूबर सन्मती मंच स्थापून त्यामध्ये अनेक प्रवचने दिली. मोबाईलवरून ती सर्व प्रवचने प्रसारित करून अज्ञानाला ज्ञान देवून आकर्षिक केले. आत्मकडे त्यांनी आत्माप या संस्कृत ग्रंथावर अभ्यासपूर्ण प्रवचने सादर केली आहेत. प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांचे क्रमश: चारित्र्य आपल्या प्रवचनाद्वारे प्रसारित करीत आहेत.

भारतीय स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) रोजी त्यांनी समडोळी ग्रामपंचायतीसमाोर येवून आपल्याला कसे स्वातंत्र्य मिळाले आणि स्वतंत्र भारताची घटना व नागरिकांची कर्तव्ये या विषयावर एक तासाचे प्रवचन दिले. धर्मानुरागी बाबासाहेब कुचनुरे, कर्मवीर भाउराव पाटील यांचे कार्य किती महत्वाचे आहे त्यांच्यामुळे अज्ञानापोटी अंधारातून दिन झालेल्या समाजामध्ये शिक्षणाचा कसा प्रसार झाला याला कारण कर्मवीरांचे कमवा व शिका हे धोरण कसे पोषक ठरले याचा त्यांनी सविस्तर उलगडा केला.

त्यांचा विशेष भर तरूणावर आहे. व्यसनमुक्ती कशी होईल, यासाठी त्यांना तरूणांना सुमार्ग हा संतोषाचा व प्रगतीचा असतो हे तरूणांच्या मनावर वसविले. आज त्यांचे वय कमी असतानाही त्यांची सर्व प्रवचने प्रगल्भ आणि वाचनिय आहेत. वेळेवर सर्व कार्यक्रमांचे नियोजन करून तडीस नेण्यास त्यांची तत्परता आहे. एकदा सन्मतीसागरजी महाराज मला म्हणाले, ने.सा. पोरगं अभ्यासू आणि हुशार आहे. भावी काळात त्याच्याकडून आमच्या अपेक्षा जास्त आहेत.

त्यांच्याहातून निश्चित पूर्ण होतील तेंव्हापासून दादाला (शांतीसागर महाराज) यांना सांगितले. त्यांची पाठ सोडायची नाही. त्यांच्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे. पू. व्द्यिासागर महाराज यांनी त्यांच्या अंतसमयी त्यांना सद्गती मिळावी म्हणून त्यांचे स्थितीकरण करून त्यांना अर्थ, रौद्र ध्यानापासून वाचवले. अशा प्रकारे त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. ्र

बालपणी त्यांना स्वप्निल या नावाने ओळखत. काही लोक त्यांना गोडबोले असेसुध्दा म्हणत. ही दोन्ही टोपणनावे किती सार्थक आहेत पहा. कारण माणसाच्या वाणीत गोडवा असेल तर सर्व तिकडे आकर्षित होतात. आज त्यांची प्रवचने ऐकत असताना त्यात फाफट पसारांना मुळीच थारा नाही. हित, मित आणि गोड भाषेत समोरच्या श्रोत्यांवर छाप पाडण्याची कला त्यांनी अवगत केली आहे. त्यामुळे मोठ्या शास्त्रींना सुध्दा त्यांचा लाभ घ्यावा, असे वाटून आज छोटे विद्यासागर म्हणून त्यांना सर्व समाज ओळखतो.

त्यांचा थोडक्यात जीवनपट

पूर्वाश्रमीचे नाव बालब्रम्हचारी विद्याधरजी बिरादर

जन्म 23 एप्रिल 1990 सोमवार सकाळी 8.05 मिनिटांनी
जन्मस्थान माधवनगर, जि. सांगली.
वडिलांचे नाव सुनील भुजगोंडा बिरादर (पाटील)
आईचे नाव सुनीता सुनील बिरादर
बहिण ब्रम्हचारी सोनाली दिदी
भाउ भरतेश बिरादर
शिक्षण दहावी मराठी माध्यम
मातृभाषा मराठी आणि कन्नड
ब्रम्हचर्य व्रत अक्षय तृतीया 2006, जैन बोडिर्ंंग सांगली
मुनी दिक्षा श्रुतपंचमी 28 मे 2009, गुरूवार
गुरूदेव शांतमूर्ती वात्सल्यरत्नाकर आचार्य भगवंत सन्मतीसागरजी महाराज,
दीक्षा स्थान निमशिरगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.

विद्यासागर महाराजांना कोणती पदवी द्यावी याबाबत समडोळीत अनेक बैठका झाल्या. अनेकांनी अनेक पदव्या सुचविल्या. तज्ज्ञांकडूनही नावे मागविण्यात आली. त्यामध्ये सोलापूरच्या जैन बोधन मासिकांचे संपादक मा. श्री. महावीर शास्त्री यांनी सुचविलेल्या आगम चक्रवर्ती या पदवीवर सर्वांचे एकमत झाले आणि हीच पदवी आज 12 ऑक्टोंबर दसर्‍या दिवशी त्यांना सन्मापूर्वक देण्यात येत आहे.

 

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज