rajkiyalive

vidhyasagar maharaj : विद्यासागर महाराजांना समडोळीत आगम चक्रवर्ती ही पदवी प्रदान

vidhyasagar maharaj : विद्यासागर महाराजांना समडोळीत आगम चक्रवर्ती ही पदवी प्रदान : आपल्या अमोघ वाणीवर समस्त श्रावकांवर छाप पाडणार्‍या आचार्य सन्मतीसागरजी महाराज यांचे परम शिष्य प. पू. 108 निर्यापक श्रमण विद्यासागरजी महाराज यांना मिरज तालुक्यातील समडोळी येथे आगम चक्रवर्ती ही पदवी प्रदान करण्यात आली. शंभार वर्षापूवीं 1924 च्या दसर्‍यादिवशी समडोळीमध्ये आचार्य शांतीसागर महाराजांना आचार्य ही पदवी देण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच पदवी देण्यात आली.

vidhyasagar maharaj : विद्यासागर महाराजांना समडोळीत आगम चक्रवर्ती ही पदवी प्रदान

विद्यासागर महाराजा ससंघ पावन वर्षायोग समडोळीमध्ये सुरू आहे. या पावनवर्षायोगमुळे समडोळीमध्ये धर्मप्रभावना चांगली झाली आहे. 100 वर्षापूर्वी याा दिवशी 1924 च्या दसर्‍या दिवशी शांतीसागर महाराजांना आचार्य ही पदवी समस्त समडोळीकरांनी दिली होती. आता 100 वर्षांनी पुन्हा एकदा 1008 भ. महावीर जिन मंदिर, पावन वर्षायोग कमिटी, समस्त श्रावक, श्र्रावकांकडून विद्यासागर महाराजांना मान्यवरांच्या उपस्थितीत आणि समस्त त्यागी जणांच्या आशिवार्दाने आगम चक्रवर्ती ही पदवी बहाल करण्यात आली. यावेळी धर्मानुरागी अशोक पाटणी, चंदूकाका सराफचे अतुल शहा हे प्रमुख पाहुणे होते तर माजी मंत्री आ. जयंत पाटील हे अध्यक्षस्थानी होते. स्वागत व प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केले.

10 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान समडोळीमध्ये आचार्य शांतीसागरजी महाराज आचार्य पदारोहण शताब्दी वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात झाला. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 11 रोजी 104 गावातील भाविकांनी आचार्य शांतीसागर महाराजांना अर्ग्य चढविण्यासाठी आले होते. 12 ऑक्टोंबर दसर्‍या दिवशी येथील पावन वर्षायोग मंडपासमोर ध्वजारोहण करण्यात आले.

दुपारच्या सत्रात मुख्य कार्यक्रमामध्ये अशोक पाटणी यांना धर्मसाम्राज्य रक्षक ही पदवी देण्यात आली तर विद्यासागर महाराजांना आगम चक्रवर्ती ही पदवी देण्यात आली. पदवीचे वाचन एन. डी. बिरनाळे, अमित शात्री यांनी केले. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, शशिकांत राजोबा, चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष बापूसाहेब ढोले, सर्व सदस्य, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज