rajkiyalive

SANGLI LOKSABHA : चंद्रहारच्या मेळाव्याला कोण येणार, कोण दांडी मारणार

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI LOKSABHA : चंद्रहारच्या मेळाव्याला कोण येणार, कोण दांडी मारणार : सांगली ः सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नेते नाराज आहेत. घटक पक्षात एकमत नसताना महाविकास आघाडीचा आज (सोमवारी) सांगलीत मेळावा होत आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आ. विश्वजीत कदम यांच्यासह तिन्ही पक्षाच्या निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे मेळाव्यास कोण येणार, कोण दांडी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागली आहे.

SANGLI LOKSABHA : चंद्रहारच्या मेळाव्याला कोण येणार, कोण दांडी मारणार

गेल्या दीड महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारीवरुन चुरस निर्माण झाली. महाविकास आघाडीची यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच ठाकरे व संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत प्रदेश व केंद्रीय पातळीवरील नेत्यांची भेट घेतली. काँग्रेसला उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीचा विषय चांगलाच गाजला. एवढे करुनही महाविकास आघाडीने एकत्रित उमेदवारांची यादी जाहीर करताना सांगलीची उमेदवारी सेनेलाच दिली. काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला देण्यात आली.

चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंड करीत अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसची बांधणी चांगली असून कार्यकर्त्यांची गावस्तरावर फळी तयार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जिल्ह्यातील राजकीय सत्यस्थिती काय आहे, हे पाहून येणार्‍या दिवसात बदल होईल. लोकांच्या भावना पाहून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे केली आहे. महाविकास आघाडीतील बिघाडी कायम आहे.

आघाडीतील मनभेद कायम असताना सोमवारी रोजी दुपारी तीन वाजता भावे नाट्य मंदिरात होत आहे.

आघाडीतील मनभेद कायम असताना काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटासह इतर मित्रपक्षांचा मेळावा सोमवारी रोजी दुपारी तीन वाजता भावे नाट्य मंदिरात होत आहे. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील यांच्यासह काँग्रेसचे आ. विश्वजीत कदम, आ. सुमनताई पाटील, आ. अरूण लाड, आ. विक्रम सावंत, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील आदी नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

या मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे उपस्थित राहतील.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील अन्य आमदारही असतील, असे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या आ. कदम, जिल्हाध्यक्ष सावंत आणि शहर जिल्हाध्यक्षांना मेळाव्याचे निमंत्रण आहे. आघाडीतील वाद शमला नसताना हे तिन्ही नेते उपस्थित राहणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज