rajkiyalive

सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले अन् इचलकरंजीतच

दिनेशकुमार ऐतवडे

सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले अन् इचलकरंजीतच :  हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले आणि इचलकरंजी या विधानसभा मतदार संघातच आहे. कारण गेल्या तीन निवडणुकीत या तिनही मतदार संघांनी विजयी उमेदवाराला उचलून धरले आहे. इतर ठिकाणी जरी मते कमी पडली तरी या तीन मतदार संघात विजयी उमेदवार कायमच पुढे राहिला आहे.

सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले अन् इचलकरंजीतच

सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले अन् इचलकरंजीतच. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्ट्ी आणि राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांच्यात सामना झाला. त्यावेळी शाहूवाडी मतदार संघात राजू शेट्टींना 88 हजार 197 मते मिळाली तर निवेदिता माने यांना 41 हजार 94 मते मिळाली. येथे राज्ाू शेट्टी हे 47 हजार 103 मतांनी आघाडीवर राहिले.

हातकणंगले विधानसभा मतदार संघात राजू शेट्टी यांना 98 हजार702 मते मिळाली तर निवेदिता माने यांना 58 हजार 783 मते मिळाली. येथे सुमारे 39 हजार 919 मते राजू शेट्टींना जास्तीची मिळाली. इचलकरंजी विधानसभा मतदार संघात राजू शेट्टींना 65 हजार 930 मत मिळाली तर निवेदिता माने यांना 58 हजार 193 मते मिळाली. या मतदार संघात राजू शेट्टींना 7 हजार 737 मताचे लीड मिळाले. ऽ009 मध्ये या तिन्ही मतदारर संघांनी विजयी उमेदवार राज्ाू शेट्टींना उचलून धरले.

2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टींनी भाजप आघाडीत जाणे पसंत केले.

त्यांच्या विरोधात काँग्रेसने माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे यांना उतरवले. त्याचा त्यांना फायदाच झाला. शाहूवाडी विधानसभा मतदार संघात राज्ाू शेट्टी यांना 1 लाख 6 हजार 193 मते मिळाली तर विरोधी आवाडेंना 63213 मते मिळाली. 42 हजार 980 मताचे मताधिक्य शेेट्टींना मिळाली.
हातकणंगले विधानसभा मतदार संघांने शेट्टींच्या पदरात 1 लाख 27 हजार 50 मते टाकली. तर विरोधी आवाडेंना केवळ 78 हजार 918 मते मिळाली. येथे सुमारे 48 हजार 132 मते मिळाली. इचलकरंजी मतदार संघात राजू शेट्टी यांना 97 हजार 691 मते मिळाली. तर होम ग्राउंड असूनही आवाडेंना 77 हजार 879 मते मिळाली. 19 हजार 812 मते शेट्टींना जास्त मिळाली.

2019 च्या निवडणुकीत संपूर्ण पारडे फिरले. राजू शेट्टींनी भाजप आघाडी सोडली आणि काँग्रेस आघाडीत सामिल झाले.

काँग्रेस आघाडीने ही जागा शेट्टींसाठी सोडली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने मैदानात उतरले. यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती. यावेळीही शाहूवाडी, हातकणंगले आणि इचलकरंजी मतदार संघांनी धैर्यशील मानेंच्या पदरात मताचे दान टाकले.
शाहूवाडी मतदार संघात धैर्यशील मानेंना 94 हजार 200 मते मिळाली तर राजू शेट्टींना 72 हजार 457 मते मिळाली. 21 हजार 743 मते धैर्यशील माने यांना जास्तीची मिळाली. हातकणंगले विधानसभा मतदार संघात धैर्यशील मानेंना 1 लाख 18 हजार 683 मते मिळाली तर राजू शेट्टी यांना 73 हजार 221 मते मिळाली. सुमारे 45 हजार467 मताचे मताधिक्य मानेंना मिळाले.

इचलकरंजी मतदार संघात धैर्यशील माने यांना विक्रमी 1 लाख 24 हजार 837 मते मिळाली तर राजू शेट्टींना केवळ 49 हजार 907 मते मिळाली. 74 हजार 930 मताचे मताधिक्य केवळ इचलकरंजीतून धैर्यशील मानेंना मिळाले. गेल्या तीन वेळच्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली असता शाहूवाडी, इचलकरंजी आणि हातकणंगले या तीन विधानसभा मतदार संघ कायमच विजयी उमेदवारच्या पाठिशी राहिल्याचे चित्र आहे.

सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले अन् इचलकरंजीतच यंदाची निवडणूक जरा वेगळी आहे.

कारण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शाहूवाडी तालुक्याला उमेदवारी मिळाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील सत्यजित पाटील शिवसेना उबाठाकडून उभे आहेत. इचलकरंजमधून उभे राहिलेले शिंदे गटाचे धैर्यशील माने हेही स्थानिकच आहेच. त्यामुळे या दोन विधानसभा मतदार संघावर त्यांचा पगडा असणार आहे हे निश्चित.
हातकणंगलेत 40 ते 45 हजार लीड कायम

गेल्या तीन निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदार संघात विजयी उमेदवाराने 40 ते 45 हजार मताधिक्य घेतले आहे.

2009 च्या निवडणुकीत 39 हजार 919 मते जास्तीची मिळाली. 2014 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजू शेट्टींना 48 हजार 132 मते जास्तीची मिळाली. 2019 च्या निवडणुकीत मात्र राजू शेट्टीना तेवढ्याच मताने पिछाडीवर रहावे लागले. सुमारे 45 हजार 467 मते धैर्यशील माने यांना लीड मिळाले. त्यामुळे हातकणंगले कोण्या एकाची मक्तेदारी नाही. यंदा तर तिरंगी, चौरंगी लढत आहे. त्यामुळे या मतदार संघात कोण लीड घेईल हे काही सांगता येत नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज