: 7 लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई.
SANGLI : बेडग मार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणार्या ट्रकवर कारवाई : सांगली : बेडग ते मिरज या मार्गावर अवैधरित्या कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक करणार्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये सुगंधी तंबाखू, पान मसाला, गुटखा यांसह 7 लाख 81 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवार दि. 29 एप्रिल रोजी सदरची कारवाई केली. या प्रकरणी जयेश महिपती भगत (वय 29 रा. वडीयेरायबाग, कडेगाव) आणि हेमंत श्रीकांत वरुडे (वय 32 रा. विटा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
SANGLI : बेडग मार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणार्या ट्रकवर कारवाई
SANGLI : बेडग मार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणार्या ट्रकवर कारवाई : सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अवैधरित्या वाहतूक होणार्या सुगंधी तंबाखू, गुटख्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी हणमंत लोहार यांना माहिती मिळाली कि, बेडग ते मिरज जाणार्या मार्गावर संशयित हेमंत वरुडे हा जयेश भगत याच्या सोबत महिंद्रा टेम्पो (क्र. एमएच 10 बिआर 2660) मधून बेकायदेशीर शासनाने निर्बंध घातलेला सुगंधी तंबाखू व गुटखा चोरून विक्री करण्यासाठी मिरजेकडे घेऊन येणार आहे.
मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्यांनी तातडीने या मार्गावर सापळा लावला. यावेळी संशयित टेम्पो हा समोरून येताना दिसला. सदरचा टेम्पो थांबवून संशयितांकडे मालाच्या बिलाबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. यावेळी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये 2 लाख 99 हजार 520 रुपयांचा विमल पान मसाला, 87 हजार 120 रुपयांचा पान मसाला, 36 हजार रुपयांचा आरएमडी पान मसाला, 74 हजार 880 रुपयांचा व्ही-1 टोबॅको, 9 हजार 680 रुपयांचे टोबॅको, 12 हजार 480 रुपयांची सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल मिळाला.
या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि, सदरचा माल हा कुडची येथील प्रोप्रायटर पाटील यांच्या गोडाऊन मधून विक्रीसाठी जयेश भगत यांच्यासह गाडीतून घेऊन जात असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून टेम्पोसह एकूण 7 लाख 81 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, हणमंत लोहार, आमसिध्द खोत, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, बाबासाहेब माने, अमर नरळे, संजय कांबळे, सोमनाथ गुंडे, सोमनाथ पतंगे, सुनील जाधव आणि अजय बेंदरे यांच्या पथकाने केली.
—————————-
संजयनगर मध्ये भरदिवसा चोरटयांनी केली घरफोडी : रोकड, सोन्याच्या दागिन्यांसह 4 लाख 38 हजारांचा मुद्देमाल लंपास.
सांगली : संजयनगर परिसरातील भारत सूतगिरणी जवळ असणार्या विवेकानंद सोसायटी मध्ये मुलीच्या लग्नासाठी सर्व कुटुंबीय घराला कुलूप लावून गेले असता अज्ञात चोरटयांनी बंद घर फोडून घरफोडी केली. घरात ठेवलेली रक्कम, मोबाईल, सोन्याचांदीचे दागिने असा एकूण 4 लाख 38 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला. सदर घरफोडीची घटना हि रविवार दि. 28 एप्रिल रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजू बापू सरगर (वय 50 रा. सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लग्न सोहळ्यासाठी सरगर कुटुंबीय कपाटाला आणि घराला कुलूप लावून दुपारच्या सुमारास गेले होते
याबाबत अधिक माहिती अशी कि, राजू सरगर हे फळ विक्रेते असून ते आपल्या कुटुंबियांसह कुपवाड रोडवर असणार्या भारत सूतगिरणी जवळील विवेकानंद सोसायटी मध्ये राहतात. रविवार दि. 28 एप्रिल रोजी सायंकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे त्यांच्या मुलीचे लग्न होते. या लग्न सोहळ्यासाठी सरगर कुटुंबीय कपाटाला आणि घराला कुलूप लावून दुपारच्या सुमारास गेले होते. यावेळी अज्ञात चोरटयांनी बंद घरावर पाळत ठेवून सरगर यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील कपाटाचे लॉक काढून त्यात ठेवलेला एक मोबाईल, साडे तीन हजार रुपये आणि 4 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने असा एकूण 4 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले. लग्नसोहळा आटोपून रात्री उशिरा सरगर हे घरी परतले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली. यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून तपासाच्या सूचना केल्या. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.