rajkiyalive

SANGLI NABK : जिल्हा बँकेच्या 70 ठाणेदारांची उचलबांगडी?

जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि एकाच टेबलवर काम करीत असलेल्या सुमारे 70 अधिकारी आणि कर्मचार्‍यांची उचलबांगडी होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच वर्षापुढील कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया राबवण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरु आहेत. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये धास्ती निर्माण झाले आहे.

SANGLI NABK : जिल्हा बँकेच्या 70 ठाणेदारांची उचलबांगडी?

पुढील आठवड्यात बदल्यांची प्रक्रिया, कर्मचार्‍यांत धास्ती

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील पाच ते सहा शाखामधील कर्मचारी अधिकार्‍यांच्या संगनमताने घोटाळा झाल्याने बँकेबाबत विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण झाले. कर्मचारी शासकीय निधीवर डल्ला मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गैरप्रकाराची बँक प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या सात कर्मचार्‍यांना आतापर्यंत निलंबित याशिवाय तिघांची तडकाफडकी जत तालुक्यात बदली केली आहे.

जिल्ह्यातील अन्य शाखांमध्ये निधी अपहारासारखा प्रकार झाला आहे,

याबाबतची चौकशी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाखांची अंतर्गत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपासणी पूर्ण झाल्याबाबतचा अहवाल येणे बाकी आहे. अहवाल अंतर आणखी कोणत्या शाखेमध्ये गडबड झाले हे लवकर स्पष्ट होणार आहे. दुष्काळ निधी अपहाराच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून भ्रष्ट कर्मचारी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी घेतला आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत, त्याला संचालकांनी सहमती दर्शवली आहे. यानुसार सुमारे 60 ते 70 जणांच्या पुढील आठवड्यात बदल्या होणार आहेत. त्यानंतर तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी असलेल्या कर्मचारी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जातील. ही संख्या दोनशेहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बँकेकडून बदल्या होत नसल्याने कर्मचारी चांगले धास्तावले आहेत. गैरसोयीच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे ठाण मांडलेल्या ठाणेदारांची गोची होणार असल्याचे स्पष्ट दिसते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज