SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या कर्मचार्यांना पगारवाढीची लॉटरी

SHARE:

सांगली ः

SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या कर्मचार्यांना पगारवाढीची लॉटरी : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीचा लाभ कर्मचार्यांनाही मिळाला आहे. बँकेच्या कर्मचार्यांना पगारवाढीचे बक्षिस देण्यात आले असुन वर्षाला सर्व कर्मचार्यांना मिळून साडेचार कोटी रूपये पगार वाढ देण्यात आली आहे. या शिवाय बँकेच्या खर्चातुन सर्व कर्मचारी व अधिकार्यांचा 1 कोटी रूपयांचा मेडिक्लेम विमा उतरवण्यात येणार आहे. या नव्या करारामुळे प्रती कर्मचारी सुमारे सहा टक्के पगारवाढ मिळणार आहे, अशी माहीती बँकेचे चेअरमन आ. मानसिंगराव नाईक यांनी दिली.

SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या कर्मचार्यांना पगारवाढीची लॉटरी

सुमारे सहा टक्के पगारवाढ, वर्षाला साडेपाच कोटींचा खर्च

वर्षभरापासुन लांबेला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्यांचा पगाराचा करार अखेर शुक्रवारी झाला. बँक कर्मचारी युनियनचे नेते माजी खा. आनंदराव आडसुळ, प्रदिप पाटील, नरेंद्र सावंत, विजय सगरे या पदाधिकार्यांसह बँकेचे सीईओ शिवाजीराव वाघ, बँकेच्या व्हा. चेअरमन जयश्री पाटील यांच्यासह बँकेचे संचालक अजितराव घोरपडे, मोहनशेठ कदम, महेंद्र लाड, संग्रामभाऊ देशमुख, पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, तानाजी पाटील, वैभव शिंदे, सुरेश पाटील, प्रकाश जमदाडे, सत्यजित देशमुख, बी.एस. पाटील,बाळासाहेब होनमोरे, अनिता सगरे,सरदार पाटील व अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा बँक व बँक कर्मचारी युनियन यांच्यामध्ये बँकेच्या कर्मचार्यांच्या पगाराबाबत दर तीन वर्षांनी करार होतो.

यामध्ये कर्मचार्यांची पगारवाढ व इतरही काही कामगार हिताचे निर्णय घेतले जातात. गतवेळचा करार होऊन तीन वर्षे होऊन गेले होते. मात्र आचारसंहिता व इतर काही कारणांनी हा करार सुमारे सहा महीन्यांहुन अधिक काळ वाढला. काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राथमिक चर्चा, बैठका यानंतर काल गुरूवारी संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व संचालकांच्या उपस्थित या करारावर शिक्कामोर्तुब करण्यात आले.

शिपायापासुन व वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत सर्वांना पगारवाढ या कराराद्वारे देण्यात आली.

गतवेळच्या करारावेळी कर्मचार्यांना वार्षिक साडेतीन कोटी रूपयांची पगारवाढ देण्यात आली होती. या वेळच्या करारात यामध्ये वाढ करत वार्षिक साडेचार कोटींची पगार वाढ देण्यात आली. या शिवाय बँकेच्या खर्चातुन वर्षाला एक कोटी रूपये खर्च करून कर्मचार्यांचा मेडिक्लेम विमा उतरवण्याचा निर्णयही झाला. याचा लाभ बँकेकडे कार्यरत असणार्या 1 हजार 193 कर्मचार्यांना मिळणार आहे.

या नव्या करारामुळे प्रती कर्मचारी एक हजार ते आठ हजार रूपयांपर्यंत पगावाढ मिळणार आहे.

सरासरी दहा टक्के पगारवाढ प्रत्येक कर्मचार्याला मिळणार आहे. हे सर्व लाभ मार्च 2023 पासुन मिळणार आहेत. त्यामुळे प्रती कर्मचारी पन्नास हजार रूपयांपासुन 1 लाखांपर्यंत फरकाची रक्कमही मिळणार आहे.

50 हजार रूपये व 60 दिवस रजा

या करारावेळी दिलेल्या पगारवाढीशिवाय कर्मचार्याचा मोठा अपघात झाला अथवा कर्मचार्यास दुर्धर आजार झाला तर बँकेकडुन 50 हजार रूपयांची मदत व 60 दिवसांची पगारी रजा देण्याचाही निर्णय घेण्यात आला. यामुळे मोठा अपघात अथवा दुर्धर आजारपणाच्या काळात कर्मचार्यावर पडणारा आर्थिक भार, येणारे आर्थिक संकट यामधुन मार्ग काढता येणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *