karjmafi news : झेड.पी.चे 13 हजारांवर कर्मचारी कर्जमाफीला मुकणार : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेमध्ये जिल्हा परिषदेचे तब्बल 13 हजारांवर कर्मचारी कर्जमाफीपासून वंचित राहणार असून त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचा सर्वाधिक समावेश आहे.
karjmafi news : झेड.पी.चे 13 हजारांवर कर्मचारी कर्जमाफीला मुकणार
अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 61 सदस्यही वंचित राहणार, शिक्षकांना लाभ नाहीच
शिवाय जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांनाही दणका बसला आहे. लोकप्रतिनिधींना कर्जमाफीचा लाभ घेता येणार नसल्याची अट शासनाने घातल्याने सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेतकर्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकबाकीत असलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ते या योजनेसाठी पात्र आहेतशेतकर्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे पीक कर्ज थकबाकीत आहे, ते या योजनेसाठी पात्र आहेत मात्र त्याच्या लाभासाठी अनेक निकष लागू केले आहेत. त्यामध्ये लाभार्थी शेतकरी लोकप्रतिनिधी असता कामा नये हीदेखील एक महत्वाची अट आहे.
त्याचा फटका नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना बसला आहे. जिल्हा परिषदेचे सर्व 61 सदस्य कर्जमाफीस अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व विविध समित्यांच्या सभापतींचाही समावेश आहे. शिवाय 10 पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती व सदस्यही वंचित राहिले आहेत.
शासनाने सरकारी कर्मचार्यांची माहितीही मागवली होती. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्या, ग्रामपंचायती व अन्य विभागांतील 13 हजार 332 कर्मचारी कर्जमाफीला अपात्र ठरले आहेत. त्यांचे वेतन 25 हजार रुपयांहून अधिक असल्याने व ते आयकर भरत असल्याने त्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी शासकीय कर्मचार्यांनाही कर्जमाफीपासून दूर ठेवण्यात आले आहे.
तशी माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक अपात्र कर्मचारी शिक्षण विभागाचे आहेत. सर्वच प्राथमिक शिक्षकांना कर्जमाफी मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










