rajkiyalive

SANGLI : जिल्ह्यात चार ते पाच जागा काँग्रेस लढवणार : आ. विश्वजीत कदम

जनप्रवास । सांगली

SANGLI : जिल्ह्यात चार ते पाच जागा काँग्रेस लढवणार : आ. विश्वजीत कदम : काँग्रेस दुबळी करण्यासाठी लोकसभेला अनेकांनी बाहेरून खडे टाकले. पण जनतेने त्यांना जागा दाखवून दिली. ते आता विधानसभेत धाडस करणार नाहीत. जिल्ह्यात काँग्रेस एकदिलाने वाढवायची आहे. विधानसभेला चार ते पाच जागा लढवायच्या आहेत आणि निवडून देखील आणण्याच्या असल्याचा निर्धार काँग्रेसचे नेते, आ. विश्वजीत कदम यांनी केला.

SANGLI : जिल्ह्यात चार ते पाच जागा काँग्रेस लढवणार : आ. विश्वजीत कदम

नूतन खासदार विशाल पाटील यांचा मदनभाऊ युवामंचच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, डॉ. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, डॉ. जितेश कदम, माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान, सुरेश आवटी, संजय मेंढे, मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे आदी उपस्थित होते.

आ. विश्वजीत कदम पुढे म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसमध्ये गटबाजी होती. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले.

पण आता गटबाजी विसरून सर्वजण एक आलो आहे. एकसंधपणे, एकदिलाने समाजकारण, राजकारण करायचे आहे. जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करायची आहे. जिल्ह्यातील काँग्रेसची मूठ बांधलेले कोणाला बघवले नाही. पण त्याची आम्हाला तमा नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमच्या मार्गात बाहेरून खडे टाकले, त्यांना जागा दाखवून दिली आहे.

आता ते विधानसभेला धाडस करणार नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काहींनी भाषणे, वक्तव्ये केली. त्याला चोख उत्तर द्यायचे आहे.विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात काँग्रेस चार ते पाच जागा लढणार आहे. त्या निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

अंतर्गत प्रश्न आम्ही सोडवू. पुढची पावले कशी टाकायची हे ठरवू. आता बांधलेली एकीची मूठ सोडायची नाही.

वसंतदादा, मदनभाऊ, डॉ. पतंगराव कदम यांच्या विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांना चांगला न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही आ. कदम यांनी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. लोकसभेचा निवडणूक निकाल पाहता विधासभेच्या 288 पैकी 158 मतदारसंघात महाविकास आघाडी आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात येणार सरकार हे सोनिया गांधी, राहूल गांधी, शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे असणार आहे. तर पूर्वीचे आणि आताचे विशाल पाटील यांच्यात खूप फरक आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना खासदार करून मी चांगला निर्णय घेतला आहे, याचा विश्वास त्यांनी आगामी काळात दाखवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

खा. विशाल पाटील म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसचे कुटुंब एक आणण्याचे काम आ. विश्वजीत कदम यांनी केले.

जात, धर्म न पाहता वसंतदादा, पतंगराव कदम यांच्या विचारांने सर्व कार्यकर्ते एकत्र आले. त्यामुळे लोकभेला विजय सुकर झाले. हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे. आगामी काळात कष्ट, काम करावे लागेल. विमानतळ पाणी प्रश्न मराठा आणि धनगर आरक्षण प्रभावीपणे मांडणार आहे. जो व्यक्ती अपक्ष का असेना मला खासदार करु शकतो. तो राज्याचे नेतृत्व करू शकतो.

जनतेने पाहिजे असा खासदार निवडून दिले. आता जनतेला पाहिजे तसे काम करण्यासाठी मी अहोरात्र झटणार आहे. जयश्रीताई पाटील यांच्या पाठिशी कुटुंबप्रमुख म्हणून राहणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसमध्ये निर्माण झालेला एकसंधपणा टिकला पाहिजे. विधानसभा, विधानपरिषदेचा निर्णय सोपा नाही. मात्र डॉ. विश्वजीत कदम हे जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य केला पाहिजे, असे मत खा. पाटील यांनी व्यक्त केले.

जयश्रीताई पाटील म्हणाल्या, विशाल पाटील हे चांगले नेतृत्व आहे.

खासदारकीच्या माध्यमातून ते आता सर्व क्षेत्रात ठसा उमटवतील. त्यांनी गट-तट न मानता सर्वांना बरोबर घेऊन काम करावे. पृथ्वीराज पाटील यांनी भाजपला विजयाचा आनंद मिळवून द्यायचा नसेल तर सांगलीत काँग्रेसने एकसंधपणे लढले पाहिजे, असे आवाहन केले.

स्वागत व प्रास्ताविक करताना आनंद लेंगरे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांचा विजय सोपा करण्यासाठी जयश्रीतार्स पाटील रात्रदिवस राबल्या आहेत. त्यामुळे सांगलीतून मताधिक्य मिळाले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सांगलीतून दोन आमदार पाठवू: आ. विश्वजीत कदम

सांगली लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्रपणे काम केल्याने विशाल पाटील यांचा विजय झाला. यापुढे अनेकजण भांडणे लावण्याचा प्रयत्न करतील, पण आपली एकी कायम ठेवली पाहिजे. सर्वांना चांगली संधी मिळवून दिली जाईल. लोकसभेला सांगलीतून खासदार दिल्लीला पाठवला. आता विधीमंडळात सांगलीतून दोन आमदार पाठवू ती जबाबदारी माझी असेल. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणाकडून होऊ नये, असे मत आ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज