जनप्रवास । सांगली
SANGLI BANK : लाडकी बहीणसाठी झिरो बॅलन्सवर खाते > शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये महिलांची झिरो बॅलेन्सवर बचत खाती उघडण्यात येणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन बॅँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी केले.
SANGLI BANK : लाडकी बहीणसाठी झिरो बॅलन्सवर खाते
जिल्हा बँकेची नवीन योजना ः आ. मानसिंगराव नाईक
आ. नाईक म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बॅँक केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर होणार्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर आहे. शेतकरी, महिला, तरुण यांच्यासह समाजातील सर्वच घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळेल यासाठी बॅँक प्रयत्नशील असते. शासनाने आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे बॅँकेत बचत खाते असणे अनिवार्य आहे.
शहरासह ग्रामीण भागात अनेक महिलांची बॅँक खाती नाहीत. नवीन खाती उघडताना किमान शिल्लक ठेवावी लागते. मात्र आता जिल्हा बॅँकेने लाडकी बहिण योजनेसाठी खाती उघडणार्या महिलांची शून्य बाकीवर (झिरो बॅलेन्स ) खाती उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील बॅेँकेच्या सर्व शाखांमध्ये कळविण्यात आले. कोणीही माहिला बॅँक खाते काढण्यापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यात येणार असल्याचे आ. नाईक यांनी सांगीतले.
मुलींच्या लग्नासाठी ’लग्नगाठ कर्ज योजना’
जिल्हा बॅँकेच्यावतीने मुलीच्या लग्नासाठी सहा टक्के व्याजदराने सोसायटीमार्फत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी बॅँकेने लग्नगाठ कर्ज योजना सुरु केली आहे. याबाबतचे परिपत्रक सर्व शाखांना देण्यात आले आहे. या योजनेसाठी बॅँकेने कोरडवाहू क्षेत्रावर प्रति एकरी 20 हजार रुपये तर बागायती क्षेत्रावर 30 हजार रूपये मात्र जास्तीत जास्त 50 हजार रुपर्य कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा गरजूंनी लाभा घ्यावा असे आवाहन बॅँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.