rajkiyalive

ICHALKARANJI NEWS : खा.धैर्यशील माने व राहूल आवाडे यांच्या ड्रायव्हरमध्ये फ्री स्टाईल  हाणामारी 

इचलकरंजी :

ICHALKARANJI NEWS : खा.धैर्यशील माने व राहूल आवाडे यांच्या ड्रायव्हरमध्ये फ्री स्टाईल  हाणामारी  :   माने- आवाडे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रृत आहे पण यांच्या वाहन चालकांनी आज एकमेकात फ्री स्टाईल हाणामारी करत कहरच केला.याची आज दिवसभर शहरातही फ्रीस्टाईल चर्चा सुरु होती.राहूल आवाडे यांचे मनोज लाखे व धैर्यशील माने यांचे चालक योगेश पाटील अशी या दोघा चालकांची नावे आहेत.

ICHALKARANJI NEWS : खा.धैर्यशील माने व राहूल आवाडे यांच्या ड्रायव्हरमध्ये फ्री स्टाईल  हाणामारी 

 पालकमंत्री आज पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी इचलकरंजीत फिरत होते घोरपडे नाट्यगृहात आश्रयाला आलेल्या पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी मुश्रीफांनी येथेही भेट दिली.यावेळी यांचेसोबत खासदार धैर्यशील माने,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आमदार प्रकाश आवाडे व यांचे चिरंजीव, माजी जिल्हापरिषद सदस्य राहूल आवाडे हेही होते. नाट्यगृहात सर्व नेतेमंडळी आपआपल्या वाहनातून उतरुन आत गेल्यानंतर माने व आवाडे यांच्या वाहन  चालकांच्यात गाडी पुढे मागे घेण्याच्या व पार्किंग करण्याच्या वादातून प्रथम शाब्दिक चकमक झाली.
दोन्ही बड्या नेत्यांच्या ड्रायव्हरमध्ये हा वाद चालू असल्याने प्रथम कोणीही हा वाद थांबवण्यासाठी पुढे आले नाहीत
त्यामुळे वाद आणखी चिघळला दोघांनीही स्टेअरिंग सोडून खाली उतरले व एकमेकाला भिडले अगदी बेल्ट काढून कपडे फाटेपर्यंत हाणामारी केली.अखेर बंदोबस्ताला असलेल्या पोलीसांनी धाव घेऊन हा वाद शमवला.
आवाडे- माने यांच्यात तिसऱ्या पिढीपर्यंत राजकीय वाद सुरुच आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भविष्यात तिसरी पिढी वाद न करत बसता हातात हात घालून  राजकीय वाटचाल करेल अशी ग्वाही जाहीर सभेत खासदार धैर्यशील माने यांनी दिली होती. आता हा वाद संपण्या ऐवजी दोघांच्याही वाहन चालकापर्यंत फ्री स्टाईलने पोहचल्याबद्दलची चर्चा दिवसभर सर्वत्र होती.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज