rajkiyalive

jayant patil news : विधानसभा निवडणूकीतही लोकसभेसारखा पैशाचा पाऊस पडेल ः आ.जयंत पाटील

इस्लामपूर ः प्रतिनिधी

jayant patil news : विधानसभा निवडणूकीतही लोकसभेसारखा पैशाचा पाऊस पडेल ः आ.जयंत पाटील : आपण सातत्याने सरकारच्या चुकांवर बोट ठेवण्याचे काम करीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निष्ठेची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपली विधानसभा निवडणूक अगदी हातघाईवर येईल. पैशाचा पाऊस पडेल. विधानसभा निवडणुकीत काळजी घ्या. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी केले. शहराची ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांना भुयारी गटारी पूर्ण करता आली नाही हे त्यांचे अपयश असल्याची टिपण्णीही त्यांनी केली.

jayant patil news : विधानसभा निवडणूकीतही लोकसभेसारखा पैशाचा पाऊस पडेल ः आ.जयंत पाटील

आ.पाटील यांनी पाच दिवसांचा इस्लामपूर शहर संपर्क दौरा सुरू केला आहे. त्याचा शुभारंभ हनुमान नगरातील बूथ क्रमांक 72 व 73 मधून करण्यात आला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध अडीअडचणी समजून घेत बूथ समित्यांच्या कामांचा आढावा घेतला. माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी सभापती खंडेराव जाधव, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष सुर्यवंशी, संदीप पाटील, माजी नगरसेवक श्रीकांत माने, बूथ अध्यक्ष सूर्याजी पाटील, गुरुराज माने प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सोनल पेठकर, स्वप्नील नलवडे यांचा सन्मान करण्यात आला. जयंत महा ई सेवा केंद्रातून काढलेल्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. आ.पाटील म्हणाले, मला राज्यात प्रचारास फिरावे लागणार आहे. त्यामुळे प्रचाराला किती येता येईल, सांगता येत नाही. त्यामुळे आपणास भेटण्यास आलो आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्य सरकारने नव-नव्या योजनांच्या घोषणांवर-घोषणा सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबरपर्यंत 6 हजार मिळतील.

त्यानंतर काही खरे नाही. सरकार खिशातील देत नाहीत, देतात तर घ्या. आपले सरकार असताना शहराच्या विकासाला मोठा निधी देत शहराच्या विकासाला गती दिली आहे. शाश्वत विकास हा आमचा प्रयत्न राहिला आहे. यावेळी नागरिकांनी पिण्याचे पाणी, रस्ता, गटारी, भटक्या जाती-जमातीचे दाखले मिळण्या अडचणी, स्पीड ब्रेकरसह विविध समस्या मांडल्या. आ.पाटील यांनी त्या ऐकून घेत आपण मांडलेल्या समस्यांचा पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.याप्रसंगी बाळासाहेब पाटील, विश्वनाथ डांगे, हणमंत माळी, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, उषा मोरे, शैलेश पाटील, मोहन भिंगार्डे यांच्यासह दोन्ही बूथमधील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज