rajkiyalive

VAIBHAV PATIL SAMDOLI : एकनिष्ठ नेत्याचा एकनिष्ठ शिलेदार वैभव पाटील

dineshkumar aitawade 9850652056

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली. या फुटीमध्ये अनेक आमदार खासदार पक्षाला सोडून गेले. परंतु आपल्या नेत्याशी एकनिष्ठ असलेले आमदार जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ कधीच सोडली नाही. त्याचप्रमाणे त्याचा एकांडा, एकनिष्ठ शिलेदार म्हणून सांगली बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्याचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने…

अगदी लहान वयातच समडोळी ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांच्या पदरात पडले आणि त्यांनी त्याचे सोने केले. गावच्या विकासासाठी त्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाचे रात्र केले. आपल्या घरातील एक दालन त्यांनी गावकर्‍यांसाठी कायमच खुले ठेवले आहे. वैभव पाटलांचा दरवाजा कुणासाठी आणि केंव्हाही उघडाच असतो.

त्यांच्या घरात जाण्यासाठी कुणाला परवानगीची गरज लागत नाही. ग्रामस्थांना माहिती आहेच की वैभव पाटलांच्या घरात गेले की आपल्याला न्याय मिळणारच. अनेक प्रकारच्या अडचणी त्यांनी आपल्या घराच्या दालनात बसून सोडविले आहेत. असा हा जयंत पाटील यांचा एकनिष्ठ शिलेदार.

इस्लामपूर मतदार संघांची पुनर्रचना झाली आणि कसबे डिग्रज मंडल इस्लामपूर मतदार संघाला जोडले गेले. अनेक मातब्बर नेत्यांचा निर्णय होत नव्हता. परंतु वैभव पाटील यांनी सर्वात अगोदर जयंत पाटील यांचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आणि आजतागायत तो तसाच आहे. अनेक निवडणुका झाल्या, अनेक प्रलोभने आणी परंतु वैभव पाटील यांनी जयंत पाटील यांची साथ सोडली नाही.

गावच्या सरपंच, बाजार समितीचे सभापती, उपसभापती, त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या सदस्या अशा वेगवेगळ्या पदावर कामे केलेेले वैभव पाटील धार्मिक क्षेत्रातही अगे्रेसर आहेत. समडोळीत सध्या शांतीसागर महाराज यांचे सप्तम पट्टाधीश आचार्य 108 अनेकांतसागरजी महाराज यांचे चातुर्मास सुरू आहे.

त्या चातुर्मास कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याचप्रमाणे 5 सप्टेंबर रोजी समडोळीमध्ये आचार्य शांतीसागर महाराज यांची 69 वी पुण्यतिथी साजरी होत आहे. ती पुण्यतिथी समडोळीमध्ये खेचून आणण्यामध्ये वैभव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या वैभव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेेच्छा…

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज