rajkiyalive

sangli crime news : सराफांना कोट्यवधींचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार जेरबंद : ओडिसामध्ये आवळल्या मुसक्या

सांगली :

sangli crime news : सराफांना कोट्यवधींचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार जेरबंद : ओडिसामध्ये आवळल्या मुसक्या : सांगली आणि आटपाडी येथील सराफांना सहा कोटी रुपयांना गंडा घालणार्या बंगाली कारागीराला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. ओरीसामधून मुख्य संशयित कारागीराला ताब्यात घेतले असून लवकरच त्याला सांगलीत आणण्यात येणार आहे.

sangli crime news : सराफांना कोट्यवधींचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार जेरबंद : ओडिसामध्ये आवळल्या मुसक्या

याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी येथील गौतम दास व सौरभ दास या बंगाली कारागीरांनी गेल्या वर्षापासून सराफांचा विश्वास संपादन केला होता. आटपाडीसह सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सराफांकडून चोख सोने घेऊन दागिने तयार करून देण्याचा ते व्यवसाय करीत होते. आटपाडी येथील सराफाकडून अडीच कोटी रुपये किंमतीचे साडेतीन हजार तोळे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सांगलीतील सराफ महेश्वर जवळे यांनी बंगाली कारागीरांनी पावणे चार कोटीची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसांत दिली होती.

आटपाडीतील तक्रारीनंतर एलसीबीच्या पथकाने बंगाली कारागिरांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. त्यातील स्वरूप दास व विश्वनाथ दास या दोघांना पश्चिम बंगालमधून अटक केली होती. पण मुख्य संशयित अजूनही पसार होता. अखेर मुख्य संशयित दास याला एलसीबीच्या पथकाने ओरीसामधून ताब्यात घेतले आहे. लवकरच त्याला सांगलीत आणण्यात येणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज