rajkiyalive

sangli crime news : सांगलीत तरुणीचा पाठलाग करत रस्त्यात अडवून केला विनयभंग : तरुणावर गुन्हा दाखल.

सांगली :

sangli crime news : सांगलीत तरुणीचा पाठलाग करत रस्त्यात अडवून केला विनयभंग : तरुणावर गुन्हा दाखल. : शहरातील एका परिसरात राहणार्‍या तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा गुरुवार दि. 03 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा आणि शुक्रवार दि. 04 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धामणी रोडवर घडला. या प्रकरणी पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

sangli crime news : सांगलीत तरुणीचा पाठलाग करत रस्त्यात अडवून केला विनयभंग : तरुणावर गुन्हा दाखल.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी हि आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरात राहते संशयित हा तरुणी कॉलेजला जात असताना, बाहेर जाताना वारंवार पाठलाग करत होता. गुरुवारी तरुणी हि कामानिमित्त घरातून बाहेर पडली आणि धामणी रोडवरून चालत निघाली असता सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास संशयित तरुण हा मोटारसायकलवरून आला.

तरुणीला रस्त्यात अडवून तुला एक वर्षांपासून बघतोय, तुझा नंबर दे असे म्हणत होता. तेवढ्यात तरुणीची आई आल्याने तो पळून गेला. घडलेला प्रकार पीडित तरुणीने तिच्या काकीला सांगितला. दरम्यान, शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तरुणीही काकी सोबत नेमीनाथनगर येथे गेली असता पुन्हा संशयित पाठलाग करत आला.

यावेळी त्याच्या काकीने त्याला थांबवून जाब विचारला असता त्याने तुम्हाला काय करायचं आहे ते करा असे म्हणत निघून गेला. घडलेल्या या प्रकरणानंतर पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज