rajkiyalive

sangli crime news : सांगलीतील कॅफेत तरुणीवर अत्याचार : आक्षेपार्ह फोटो व्हिडीओ काढून धमकी देत वारंवार केले अत्याचार :

नराधम तरुणास पोलिसांनी केली अटक.

सांगली :

sangli crime news : सांगलीतील कॅफेत तरुणीवर अत्याचार : आक्षेपार्ह फोटो व्हिडीओ काढून धमकी देत वारंवार केले अत्याचार : : शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या तरुणीच्या कौटुंबिक दुबळेपणाचा फायदा घेत कॉलेज कॉर्नर येथील एका कॅफे मधील कंपार्टमेंट मध्ये अत्याचार केले. याठिकाणी तिचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत लॉज मध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणीने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिच्या फिर्यादीवरून संशयित शाहिद इकबाल मुजावर (वय 20) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सदरची घटना हि मार्च 2023 ते सोमवार दि. 07 ऑक्टोबर 2024 या कालावधीत घडली.

sangli crime news : सांगलीतील कॅफेत तरुणीवर अत्याचार : आक्षेपार्ह फोटो व्हिडीओ काढून धमकी देत वारंवार केले अत्याचार :

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, पीडित तरुणी हि शहरातील एका परिसरात राहत असून ती शहरातीलच महाविद्यालयात शिक्षण घेते. पीडित मुलीची ओळख हि संशयित नराधम शाहिद मुजावर याच्याशी झाली. मार्च 2023 ते सोमवार दि. 07 ऑक्टोबर या कालावधीत संशयित शाहिद मुजावर याने पीडित मुलीशी ओळख वाढवून तिच्या सामाजिक व कौटुंबिक दुबळेपणाचा फायदा घेत प्रथम कॉलेज कॉर्नर येथे असणार्‍या कॅफे शॉपमधील पार्टिशन केलेल्या जागेत तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध केले.

या ठिकणी तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कोल्हापूर रोडवरील लॉजमध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित करून अत्याचार केले. यानंतरही कोल्हापूर रोडवरील आणखी एका लॉज येथे नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध करून तिच्या असह्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद पीडित तरुणीने दिली. वारंवार होणार्‍या अत्याचाराला कंटाळून पीडित तरुणीने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत नराधम मुजावर याला अटक केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज