इस्लामपूर
sharad pawar news : उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडविण्याची ताकद जयंतरावांमध्ये, जयंत पाटलांवर राज्याची जबाबदारी, त्यांच्यामागे खंबीर उभे रहा : उद्याचा प्रगत महाराष्ट्र उभारण्याची आणि सावरण्याची कामगिरी आतां तरुण पिढीला करावी लागेल. स्त्रियांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत. सध्याचे सत्ताधारी आता ठेवायचे नाहीत याचा विचार बहिणींनी आणि भावांनी करायला हवा. येत्या निवडणुकीत तुम्हाला सध्याचे चित्र बदलण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खा. शरद पवार यांनी केले. ते म्हणाले, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात बदल घडेल.
sharad pawar news : उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडविण्याची ताकद जयंतरावांमध्ये, जयंत पाटलांवर राज्याची जबाबदारी, त्यांच्यामागे खंबीर उभे रहा
इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपप्रसंगी श्री. पवार बोलत होते. माजी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार निलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक माजी मंत्री शिवाजीराव नाईक,दिलीप पाटील, प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निवडणुकीत राज्यातील जबाबदारी पार पाडतील. तुम्ही कार्यकर्त्यांनो मतदार संघात कार्यरत रहा. सध्याचे महाराष्ट्राचे चित्र बदलण्याची जबाबदारी आता तरुण पिढीवर आहे. यापूर्वी महाराष्ट्र अनेक क्षेत्रात पुढे होता. प्रगत राज्य आता तळागाळाला गेला आहे. शक्तिशाली प्रगत महाराष्ट्र करण्याची भूमिका आता घ्यायला हवी. महाराष्ट्राला पूर्वस्थितीत आणण्याचे काम तुम्हा सर्वांना करावयाचे आहे.
शरद पवार म्हणाले, सध्याचे वातावरण पाहिले तर महिला तरुणी असुरक्षित आहेत. बहिणींना सन्मान देण्यासाठी कायमस्वरूपी योजना आखणे गरजेचे आहे. हे आम्ही केले. त्यामुळे राजकारणात महिलांना आरक्षण आले. सामान्य महिला सरपंच, सभापती,महापौर झाल्या. आम्ही जो निर्णय घेतला तो कायमस्वरूपी घेतला. सन्मान करायचाच असेल तर तो टिकायला लावा ही आमची भूमिका आम्ही जपली आहे.
महाराष्ट्राच्या निर्मिती नंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र कसा असावा याबाबत भूमिका मांडली. त्याचा कित्ता गिरवत राज्याच्या अनेक नेत्यांनी हीच भूमिका पुढे ठेवली होती. ती काहीनी खंडित केली. राज्यात राष्ट्रवादीचे विचार दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य ढवळून काढले आहे. आता सत्तांतरासाठी तुम्ही महत्त्वाची भूमिका घ्या अशी साथ शरद पवार यांनी घातली.
आ. जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पूर्ण तिजोरीचा बोजवारा उडालेला आहे. विकासाचा दर 9.4% वरून आता साडे चार खाली आहे. महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यस्थेची परिस्थिती प्रचंड बिघडलेली आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा महाराष्ट्र जागेवर आणण्याचे काम भविष्यकाळात करायचे आहे. सामाजिक न्याय, मागासवर्गीय, आदिवासी समाजासह सर्व प्रकल्पांचे पैसे बंद करण्यात येत आहेत. फक्त निवडणुकांच्या डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा सपाटा लावला आहे.
सरकारची तिजोरी मोकळी करण्याचे काम यांनी केले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणींच्या केसाला धक्का लागणार नाही अशी कायदेशीर व्यवस्था आम्ही तयार करू. लाडक्या बहिणी योजना व्यवस्थितपणाने चालतील आणि चार पैसे जास्त तुम्हाला कसे देण्यात येतील अशी मार्ग काढण्याची भूमिका निर्माण करू. देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी उद्घाटन केलेला पुतळा पैसे खावुन भ्रष्टाचार केल्याने कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जर तुम्ही पैसे खाणार असाल तर महाराष्ट्रातली जनता 20 नोव्हेंबरला यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. हिच आता प्रचाराची सभा प्रचाराची सभा आहे. 24 तारखेला गुरुपुष्प नक्षत्रावर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं मूर्तीमंत उदाहरण जयंत पाटील आहेत. पंतप्रधानांची पुण्यातील सभा पावसाने रद्द झाली होती, पण इथे चित्र वेगळे आहे. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार. ही निवडणूक महाराष्ट्र धर्म वाचवण्याची आणि टिकवण्याची आहे. गद्दारांना घरी बसवण्याची पवार वेळ आली आहे.
खासदार निलेश लंके म्हणाले, इतक्या पावसात मोठ्या संख्येने उपस्थित असणार्या वाळवेकारांना मुजरा. यावेळी आपलेच सरकार सत्तेत येणार आहे. उत्तमराव जानकर म्हणाले, कॉप्या करून पास झालेल्या महायुती सरकारला गाडण्यासाठी या भूमीतून सुरुवात झाली आहे. हे नतद्रष्ट सरकार कोणत्याही परिस्थितीत गाडायचे आहे. दिलीपराव पाटील म्हणाले, आता जयंत पाटील यांच्या निष्ठेची परीक्षा पाहू नका. त्यांना संधी द्या. त्यांनी माझ्याकडे ही चाचपणी केली, पण मी तीन पिढ्या निष्ठा जपली आहे.
सभेपूर्वी मुसळधार पावसाने झाडपले..! तरीही गर्दी कायम..!
शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपाचे निमित्ताने इस्लामपुरात खुल्या नाट्यगृहात सायंकाळी सहा नंतर कार्यकर्ते जमू लागले होते. सव्वा सहा वाजता काळे ढग दाटून आले. आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळला. सव्वा तास मुसळधार पावसाने इस्लामपूर शहराला झोडपले. तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाऊस उघडल्यानंतर सभास्थळी प्रचंड गर्दी केली होती. मैदानावर खुर्चीवर बसून नागरिक उपस्थित होते.
मेरे पास पवार साहेब ..!
राष्ट्रवादी पक्षाची विभागणी झाली तेव्हा आपले पलीकडे गेलेले सहकारी सांगत होते, काय आहे तिकडे ? पक्ष रिकामा होत आहे. इकडे या इकडे तुम्हाला मंत्रिपद राखून ठेवले आहे.
असे असले तरी मी पवार साहेबां सोबत राहणे पसंत केले. हे सांगताना सभास्थळी जयंत पाटलांनी दिवार चित्रपटातील डायलॉग
म्हणून दाखवत मेरे पास पास पवार साहेब आहेत असे सुनावल्याचे सांगितले..
संघर्षाच्या काळात आर आर आबा हवे होते..!
शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपाच्या भाषणात जयंत पाटील यांनी आज आर आर आबा हवे होते असे सांगत त्यांच्या आठवणी सांगितल्या.
आजच्या परिस्थितीत आबा मी व अमोल कोल्हे यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला असता. आबा व आपले नाते मित्रत्वाचे होते.
शरद पवार साहेबांनी एका जिल्ह्यात दोन मंत्री पदे दिली. आम्हाला राजकारणात सगळे धडे दिले. त्यामुळे सलग सात वेळा कार्यकर्त्यांच्या जीवावर विजय नोंदवत गेलो. आबा आणि मी त्याकाळी सर्व जिल्हा राष्ट्रवादीमय केला होता. आजही आबांचे कुटुंबातील सदस्य पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत..
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.