rajkiyalive

sangli crime news : कवलापूर आणि आटपाडीतील गुन्हेगारांच्या दोन टोळ्या हद्दपार : दोन वर्षांसाठी कारवाई : टोळीतील सहाजणांचा समावेश.

सांगली :

sangli crime news : कवलापूर आणि आटपाडीतील गुन्हेगारांच्या दोन टोळ्या हद्दपार : दोन वर्षांसाठी कारवाई : टोळीतील सहाजणांचा समावेश. : खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे यांसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मिरज तालुक्यातील कवलापूर येथील धीरज नाईक आणि आटपाडी येथील घरफोडी करणार्‍या शाहरुख पवार यांच्या टोळीला सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. या कारवाई मध्ये टोळीतील सहा जणांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदरची कारवाई केली. या दणक्यामुळे गुन्हेगारी टोळ्याचे धाबे दणाणले आहे.

sangli crime news : कवलापूर आणि आटपाडीतील गुन्हेगारांच्या दोन टोळ्या हद्दपार : दोन वर्षांसाठी कारवाई : टोळीतील सहाजणांचा समावेश.

टोळी प्रमुख धीरज भारत नाईक (वय 23) संतोष उर्फ अशोक नाईक (वय 27), अक्षय उर्फ आकाश सतीश नाईक (वय 27 सर्व रा. कवलापूर), टोळी प्रमुख शाहरुख विजय पवार (वय 45), देवगण उर्फ देव्या बापू पवार (वय 26) आणि लखन विजय पवार (वय 45 सर्व रा. आटपाडी) अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. कवलापूर येथील धीरज नाईक याच्या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, अपहरण करून मारहाण करणे यांसह गंभीर गुन्हे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी टोळीवर हद्दपारीची प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना पाठवला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून उपअधीक्षक विमला एम यांच्याकडे चौकशीसाठी अहवाल पाठवला. त्यांच्या चौकशीचा अहवाल, टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा अहवाल, त्यांच्या हालचाली या बाबींचा विचार करून नाईक टोळीला सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपारचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला. दुसरीकडे आटपाडीतील पवार टोळीवर जमाव जमवून घरफोडी, चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव आटपाडी पोलीस निरीक्षकांनी पाठवला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून या टोळीला देखील दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोकर, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, किरण चौगले, विनय बहिर यांनी केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज