जनप्रवास । सांगली
sangli vidhansabha news : जयश्रीताई साथ द्या, दादा घराण्यातील पराभवाचे उपटे काढण्याची हीच वेळ पृथ्वीराज पाटील यांचे भावनिक आवाहन : लोकसभेला काँग्रेस एकविचाराने लढली. त्यामुळे भाजपचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत देखील एकी हवी आहे. जयश्रीताई पाटील यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. वसंतदादा कुटुंबियात झालेल्या पराभवाचे उपटे काढण्याची हीच वेळ आली आहे. आ. सुधीर गाडगीळ यांचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले.
sangli vidhansabha news : जयश्रीताई साथ द्या, दादा घराण्यातील पराभवाचे उपटे काढण्याची हीच वेळ पृथ्वीराज पाटील यांचे भावनिक आवाहन
पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. गणपती मंदिरापासून रॅलीला सुरूवात झाली. तेथून येथील काँग्रेस कमिटीसमोर विजयी संकल्प सभा झाली. या सभेत उमेदवार पृथ्वीराज पाटील बोलत होते. या सभेला डॉ. प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, शिवसेना (उबाठा) गटाचे बजरंग पाटील, शंभूराज काटकर, कॉ. उमेश देशमुख, नामदेव कस्तुरे, अय्याज नायकवडी, प्रा. सुकुमार कांबळे, माजी नगरसेवक ज्योती आदाटे, करीम मेस्त्री, विजय घाडगे, प्रमोद सूर्यवंशी, अभिजीत भोसले, किरण सूर्यवंशी, शेडजी मोहिते, सविता मोहिते, धनपाल खोत आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात इतिहास घडवला. विधानसभा निवडणुकीत देखील हेच करायचे आहे. सांगलीकर जनता पाठीशी आहे. मी एकटा नाही. काँग्रेसचा निष्ठावंत व सच्चा वारसा मला लाभला आहे. इंदिरा गांधींच्या असताना 1978 ला काँग्रेस फुटली तेव्हा माझे वडील गुलाबराव पाटील त्यांच्यासोबत उभे राहिले. या परिणाम सोसावे लागले. आमच्या घरावर दगड पडले होते. काँग्रेससाठी खूप भोगले आहे. पण मी भाजप सोडणार, असा अपप्रचार झाल्याने मोठे दुख: झाले. पण मी संयम सोडला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत 86 हजार मते मिळाली. तरी देखील पराभव झाला. पण न खचता काम सुरू ठेवले.
महापुरात आमदार घरात बसले, मी लोकांत होतो. या निवडणुकीत उमेदवारीची मागणी केली. जयश्रीताई पाटील यांनी देखील मागणी केली होती. मला उमेदवारी मिळाली, जल्लोष केला नाही. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगून आलोय प्रथम जयश्रीताई पाटील यांना विधानपरिषदेचा शब्द द्या. त्याशिवाय माझा विजय शक्य नाही. रमेश चेन्नीथला देखील त्यांच्याशी बोलले आहेत. त्यामुळे त्यांचा राग शांत होईल. काँग्रेस एकसंधपणे लढेल. मदनभाऊंचा झालेला पराभव मी पाहिला आहे. हा कलंक आता पुसायचा आहे. पुन्हा भाजपचा आमदार होऊ द्यायचा नाही. सर्वांनी कामाला लागवे व आ. गाडगीळ यांची हॅट्ट्रिक रोखावी, असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले.
आमदार विश्वजीत कदम यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. ते म्हणाले,, ‘पृथ्वीराज कदम हे कष्ट घेणारे नेते आहेत. पद नसताना ते तुमच्यासाठी झटले आहेत. त्यांना संधी द्या, आशीर्वाद द्या. ते अधिक व्यापक काम करून दाखवतील. सुकुमार कांबळे म्हणाले, लाडकी बहिण योजना खोट्या आहेत. भाजपचे हे सरकार खोटे बोलणारे आहे. मदनभाऊ पाटील गटाला त्यांनी आवाहन केले. ते म्हणाले, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी होते, मात्र चिंता करू नका. त्या अश्रूंची फुले होतील. जयश्रीताई विधान परिषदेच्या आमदार होतील आणि या शहराला काँग्रेसचे दोन-दोन आमदार लाभतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिवराज काटकर म्हणाले, लोकसभेला काहींनी चुकीचे काम केले, पण झाले गेले विसरून खा. विशाल पाटील यांनी आमच्या नेत्यांची मुंबईत भेट घेतली. पण आपण महाविकास आघाडीत आहोत, दगाफटका आता होता कामा नये. आम्ही जसे काँग्रेसचे काम करत आहे. तसे काम काँग्रेसने मिरज विधानसभा मतदारसंघात करावे, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस नेते, पदाधिकार्यांची गैरहजेरी पण जयंत सेनेची उपस्थिती…
पृथ्वीराज पाटील यांच्या विजय संकल्प सभेसाठी काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांची गैरहजेरी होती. या बरोबर काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, नगरसेवकांनी देखील मेळाव्याकडे पाठ फिरवली होती. मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यावेळी हजर होते. या सभेत देखील जयंत पाटील व पृथ्वीराज पाटील यांचे पोस्टर झळकत होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.