rajkiyalive

sangli vidhansabha news : विष्णूअण्णा घराणे सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात, पण यश एकदाच

दिनेशकुमार ऐतवडे

sangli vidhansabha news : विष्णूअण्णा घराणे सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात, पण यश एकदाच : सांगली विधानसभेसाठी जोरदार रणकंदन सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरायचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. आत्तापर्यंत भाजपकडून सुधीर गाडगीळ, काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णुअण्णा पाटील घराण्याने यंदा सातव्यांदा रिंगणात उतरले आहे. परंतु त्यांना केवळ एकदाच यश मिळाले आहे.

sangli vidhansabha news : विष्णूअण्णा घराणे सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात, पण यश एकदाच

सांगलीच्या दादा घराण्याने राज्यात दबदबा निर्माण केला होता. वसंतदादा पाटील राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते. राज्यातील उमेदवारीची नावे सांगलीतील बंगल्यातून फायनल व्हायची. परंतु दादांच्या नंतर दादा घराण्याला विधानसभेत म्हणावे तसे यश मिळाले नाही. दादांचे पुतणे असणारे विष्णुअण्णा पाटील यांनीही सहकारात मोठे काम केले आहे. सहकार महर्षि म्हणून ते परिचित होते. अनेेेेेक सहकारी संस्थांवर त्यांनी चांगले काम केले परंतु विष्णुअण्णांना कधी विधानसभा लाभली नाही.दोनदा ते विधानसभेला उभे राहिले परंतु दोन्ही वेळेला त्यांचा पराभव झाला.

1986 मध्ये दादा राजस्थानचे राज्यपाल झाले आणि सांगील पोटनिवडणूक लागली. काँग्रेसची उमेदवारी दादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांना मिळाले. त्यांच्या विरोधात सर्व पक्षीय उमेदवार म्हणून पै. संभाजी पवार यांना संधी मिळाली. या निवडणुकीत अगदी थोडक्या मतात विष्णुअण्णांचा पराभव झाला. दादांच्या घराण्यात 1952 पासून पहिल्यांदाच पराभव झाला. दादांच्या हयातीतच विष्णुअण्णांचा पराभव झाल्याने दादांच्या मनाला लागले होते.

पुढे 1990 मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या. पुन्हा एकदा काँग्रेसची उमेदवारी विष्णुअण्णा पाटील यांनाच मिळाली. यावेळी दादांचे निधन झाले होते. विष्णुअण्णांच्या विरोधात पुन्हा एकदा संभाजी पवारच उभे राहिले. यावेळीही विष्णुअण्णांचा पराभव झाला. संभाजी पवार दुसर्‍यांना निवडून आले.

पाच वर्षानंतर 1995 मध्ये वसंतदादांचे पूत्र प्रकाशबापू पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात विष्णुअण्णांचे पूत्र मदन पाटील यांनी बंडखोरी केली. यावेळीही विरोधात जनता दलाकडून संभाजी पवारच होते. काँग्रेसच्या मतात विभाजन झाले आणि संभाजी पवारांची विजयाची हॅट्रटीक झाली. यावेळी विष्णुअण्णा घराण्याचा तिसर्‍यांदा पराभव झाला.

1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. लोकसभा आणि विधानसभा एकत्रच झाली. लोकसभेला प्रकाशबापू विरोधात मदन पाटील आणि विधानसभेला दिनकर पाटील विरोधात संभाजी पवार अशी लढत झाली. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत दादा घराण्यातील आणि विष्णुअण्णा घराण्यातील कोणीच उमेदवार नव्हते.

2004 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी दिनकर पाटील यांना मिळाली. यावेळी मदन पाटील यांनी बंडखोरी केली आणि विजय मिळविला. यावेळी पहिल्यांदाच विष्णुअण्णा घराण्यातील माणूस आमदार झाला. यावेळी दिनकर पाटील आणि संभाजी पवार यांचा पराभव झाला.

2009 च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी पुन्हा मदन पाटील यांना मिळाली. त्यांच्या विरोधात भाजपकडून संभाजी पवार राहिले. आणि पुन्हा एकदा विष्णुअण्णा घराण्याचा पराभव झाला.

2014 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपमध्ये निवडणूक रंगली. यावेळी काँग्रेसकडून पुन्हा एकदा मदन पाटील आणि विरोधी भाजपकडून नवख्या सुधीर गाडगीळांना उमेदवारी मिळाली. यावेळी पुन्हा एकदा मदन पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर 2016 मध्ये मदन पाटलांचे निधन झाले. 2019 च्या निवडणुकीत दादा घराण्यातील तसेच विष्णुअण्णा घराण्यातील कोणीच विधानसभेला उभे राहिले नाही. पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. परंतु त्यांचा पराभव झाला सुधीर गाडगीळ दुसर्‍यांदा निवडून आले.

आता 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा विष्णुअण्णा घराण्यातील मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी भरपूर प्रयत्न केले परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. यावेळी जर जयश्री पाटील शेवटपर्यंत मैदानात राहिल्या तर विष्णुअण्णा घराण्यातील सांगली विधानसभेसाठी ही सातव्यांदा उमेदवारी असेल. पण दुर्दैवाने त्या घराण्याला केवळ 2004 मध्ये एकदाच विजय मिळवता आला. यंदाची ही सातवी निवडणूक असून, या निवडणुकीत काय होते ते 20 नोव्हेंबरला निकालादिवशीच कळेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज