rajkiyalive

jayant patil news : आ.जयंत पाटील यांच्या विक्रमी विजयात महिलांचे मोठे योगदान ः पुष्पलता खरात

jayant patil news : आ.जयंत पाटील यांच्या विक्रमी विजयात महिलांचे मोठे योगदान ः पुष्पलता खरात : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीने महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंतराव पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर शहरात घर टू घर पोचत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना शहरातील महिलांनी साहेब हे आमचे भाऊ आहेत. त्यांनी आम्हा महिलांचे आरोग्य, शिक्षण व रोजगाराची काळजी घेतली आहे. महिलांचा सन्मान व आदर केलेला आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहोत, असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साहेबांचा विजय निश्चित आहे. या विक्रमी विजयात आम्ही महिला मोठे योगदान करू. असा विश्वास महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी व्यक्त केला.

jayant patil news : आ.जयंत पाटील यांच्या विक्रमी विजयात महिलांचे मोठे योगदान ः पुष्पलता खरात

माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, माजी नगरसेविका अ‍ॅड.कोमल बनसोडे, प्रदेश सदस्या कमल पाटील, माजी शहराध्यक्षा रोझा किणीकर, सरचिटणीस उषा मोरे-पंडीत, उपाध्यक्षा मनिषा पेठकर, मालन वाकळे, योगिता माळी, सुप्रिया पेठकर, अलका शहा, सुनंदा साठे, युवती शहराध्यक्षा दीपाली साधू, माजी अध्यक्षा प्रियांका साळुंखे, उपाध्यक्षा सविता सावंत, फरीदा चाऊस, जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा पाटील, शैलजा जाधव, माजी नगरसेविका संगीता कांबळे, साधना ताटे, मंदाकिनी चव्हाण, अंजना चव्हाण, ज्योती चव्हाण, गीता पाटील, रुपाली पाटील यांच्यासह शहरातील माजी नगरसेविका, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां प्रचार दौर्‍यात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी काही भागात महिलांच्या घरगुती बैठकाही घेण्यात आल्या.पुष्पलता खरात म्हणाल्या, राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपा युतीला मोठा झटका दिला आणि त्यांना लाडकी बहीण आठवली. महिलांना एका हाताने पंधराशे रुपये दिले आणि दुसर्‍या बाजूने तेल, डाळी, स्टँपचे दर वाढविले आहेत. राज्यातील महिला सुरक्षित आहेत का? लाडकी बहीण योजनेस आमच्या स्वाभिमानी महिला भुलणार नाहीत. तिच्या रोजगार, आरोग्य, शिक्षणाबद्दल सरकारने व विरोधकांनी काय केले?

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज