jain samaj news : विक्रमी नोंदणीमुळे जैन बोर्डींगच्या वधूवर मेळाव्याचे ठिकाण बदलले : दक्षिण भारत जैन सभेचे शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, सांगली च्या वतीने रविवार दि. 08 डिसेंबर 2024 रोजी 19 व्या भव्य जैन वधु वर व पालक परिचय स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. सदर मेळाव्यास संपुर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातून तसेच परदेशातुनही वधु वरांची ऑनलाईन नोंदणी होत असते. या मेळाव्याच्या माध्यमातून एकमेकांचा परिचय होऊन त्याचा व्यापक प्रमाणात जैन समाजातील इच्छूक वधू वरांना लाभ मिळणार आहे.
jain samaj news : विक्रमी नोंदणीमुळे जैन बोर्डींगच्या वधूवर मेळाव्याचे ठिकाण बदलले
या मेळाव्यासाठी आज अखेर 950 पेक्षा जास्त वधूवरांची नोंदणी झाली आहे. काळाची गरज ओळखून आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून हा मेळावा आयोजित केला जातो. बोर्डिंगने उमेदवारांच्या सोयीसाठी संपुर्ण ऑनलाईन पध्दतीने ुुु.क्षरळपलेरीवळपसीरपसश्रळ.लेा या वेबसाईटवर नोंदणी सुविधा उपलब्ध केली आहे. त्यास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विक्रमी नोंदीमुळे उमेदवार व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी मेळाव्याचे ठिकाण बदलावे लागले आहे. हा मेळावा धामणी ते फळ मार्केट रोडवरील ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न होणार आहे.
जैन वधु वर मेळाव्यानिमित्त मुला मुलींचे छायाचित्रासह, सविस्तर माहिती असलेले अदययावत रंगीत माहिती पुस्तीका प्रकाशित करण्यात येणार आहे. याचा लाभ सर्व नोंदणीकृत उमेदवारांना आणि पालकांना होणार आहे. आजच्या धावपळीच्या जगात मुला मुलींचे लग्न जमविणे ही बाब अत्यंत अवघड होत आहे. त्यामुळे एक सामाजिक उपक्रम म्हणून जैन बोर्डिंग मार्फत मागील 21 वर्षापासून भव्य जैन वधू वर व पालकमेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. दिवसेंदिवस अशा मेळाव्याची उपयोगीता वाढतच आहे. समाजाची ही गरज ओळखूण सांगली जैन बोर्डीगच्या वतीने सामाजिक भावणेतून अत्यल्प फी मध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते, तसेच विधवा, अपंग उमेदवारांना मोफत नोंदणीची सोय उपलब्ध आहे.
सदर मेळाव्याचे उदघाटन चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रिीज, नांदणी चे चेअरमन मा. श्री. आण्णासाहेब चकोते व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पदमिनी चकोते यांचे शुभहस्ते तसेच दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा. श्री. भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. द.भा. जैन सभेचे चेअरमन मा. श्री. रावसाहेब जि . पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सदर मेळाव्यास महाराष्ट्र, कर्नाटकसह देशातून यावर्षी इच्छुक वधू वरांच्या सुमारे 950 पेक्षा जास्त नोंदणी झाल्या आहेत. सर्व नोंदी ऑनलाईन सुविधाद्वारे झाल्या आहेत. मेळाव्यादिवशी सुमारे 200 पेक्षा जास्त नोंदणी होतील असा संयोजकांचा अंदाज आहे. सदर मेळाव्यास यावर्षी एकूण 1100 ते 1200 विक्रमी नोंदी होतील असा विश्वास वाटतो. सदर मेळव्यासाठी जैन महीला परिषद, श्रीमतीबाई कळंत्रे आक्का महीलाश्रम, वीर सेवा दल, स्नेहज्योत महीला मंडळ या सर्वांचे सहकार्य मिळते.
या मेळाव्याचे नियोजन जैन बोर्डिंगचे चेअरमन प्रा. राहुल चौगुले, व्हा. चेअरमन प्रशांत अवधुत, सेक्रेटरी अॅड. मदन पाटील, जॉ. सेक्रेटरी इंजी.संदिप हिंगणे, सुपरिटेंडेंट इंजी राजेश पाटील, जॉ. सुपरिटेंडेंट प्रविण वाडकर, वधु वर मेळावा चेअरमन इंजी. बी. के. पाटील (अक्कोळकर ), व्हा. चेअरमन सौ. अनिता पाटील, सेक्रेटरी इंजी. विशाल चौगुले, जॉ. सेक्रेटरी श्रीमती छाया कुंभोजकर, कार्याध्यक्ष श्री. महावीर आडमुठे, तसेच बोर्डिंगचे कार्यकारिणी सदस्य आदींनी केले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.