दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056
jaykumar gore news : जयाभाऊ रमले जुन्या आठवणीत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे जवळचे स्नेही माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांच्या घरी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी जगासाठी जयकुमार असलेले आमच्यासाठी जयाभाऊच आहेत, असे उद्गार सांगलीवाडीतील सर्वसामान्य करीत आहेत. एवढी नाळ जयाभाऊंची सांगलीवाडीकरांशी जुळेलेले पहायला मिळाले.
jaykumar gore news : जयाभाऊ रमले जुन्या आठवणीत
साधारण 1998 ते 2007 मध्ये जयकुमार गोरे सांगलीत रहायला होते. माजी आमदार दिनकर पाटील आणि जयकुमार गोरे यांचे जिगरी दोस्ती. 1999 मध्ये दिनकर पाटील काँग्रेसकडून आमदार झाले. तेंव्हापासून जयकुमार गोरे दिनकर पाटील यांच्या पाठिशी सावलीप्रमाणे उभे राहिले. त्यामुळे त्यावेळच्या सांगली विधानसभा मतदार संघातील मिरज पश्चिम भागातील सांगलीवाडीबरोबरच समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कसबे डिग्रज या गावातील दिनकरतात्यांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे जिवाभावाचे संबंध जुळले. प्रत्येक मित्राच्या अडचणीत उभा राहणारा जयाभाउ सर्वांना आपला वाटायचा. धिप्पाड शरीरयष्टी, गालावर खुरटी दाढी अन् डोळ्यावर काळा गॉगल घातलेला जयाभाउ सर्वांच्या हद्यातील ताईत केंव्हा बनला कळलेच नाही.
2007 मध्ये जयाभाउंंनी दहीवडी गाठले. तेथे गेल्यानंतर लगेचच त्यांना जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी मिळाली. 2009 मध्ये राज्यातील सर्वत्र विधानसभा मतदार संघांची पुनर्रचना झाली आणि माण खटाव मतदार संघ खुला झाला. जिल्हा परिषद सदस्य असतानाही जयाभाउंं विधानसभेच्या मैदानात उतरले आणि पहिल्यांदा आमदारकी मिळवली. त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 मध्ये त्यांनी आपली विजयी पताका कायम ठेवली. गेल्या 15 वर्षात जरी जयाभाउ लांब असले तरी त्यांनी सांगलीशी नाळ कधी तुटू दिली नाही. अधून मधून त्यांचा कार्यकर्त्यांचा संपर्क असायचा. दहवडीवरून जाताना त्यांची भेट हमखास व्हायची.
महायुतीची सत्ता आली आणि मुख्यमंत्री देवंेंंद्र फडणवीस यांनी जयाभाउंंना आपल्या सोबत मंत्रीमंडळात घेतले. त्यांच्यावर ग्रामविकास खात्याचे कॅबीनेट खाते दिले. आजपयर्र्ंत या खात्यावर आण्णा डांगे, आर. आर. पाटील, जयंत पाटील यांनी आपली मोहोत उमटवली आहे. एवढे मोठे खाते मिळाल्यामुळे कार्यकर्ते तर खूश आहेतच पण त्यांच्याबरोबर सांगलीकरही खूश आहेत.
मंत्रीपद मिळताच जयाभाउ दोन चार दिवसानंतर लगेच सांगलीवाडीला आले. त्यांनी आपले जिवाभावाचे साधीदार माजी आमदार दिनकर पाटील यांची त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. आपल्या घरातील माणूस मंत्री झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावर होता. यावेळी अजिंक्य पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.