sangli hastkala news : उद्योजकता विकास कार्यक्रमास प्रतिसाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हस्तशिल्प योजनेंतर्गत राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रम योजना घटनाद्वारे उपक्रम राबविण्यात आला. हस्तकला कारागिरांना विविध उपक्रम, कार्यक्रम अंतर्गत उद्योजक, बँकींग, आयात निर्यात, ई मार्र्केटींग, फॅशन डिझायनिंग लेबलिंग तसेच उत्पादक व विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
sangli hastkala news : उद्योजकता विकास कार्यक्रमास प्रतिसाद
यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विविध विषयातील डिझायनर व विषयतज्ज्ञ यांचे दि. 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत हस्तकला कारागिरांना मार्गदर्शन करण्यात आले. मुद्रा लोन, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनाबाबत माहिती देण्यात आली.
या शिबिराचे आयोजक समडोळी हस्तकला प्रोड्युसर कं. लि. चे संचालक प्रा. बी. एस. चव्हाण हे होते. प्रायोजक म्हण्ाून विकास आयुक्त कार्यालय हस्तकला यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या अंतर्गत 20 महिला कारागिरांनी लाभ्घ् घेतला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.