rajkiyalive

jayant patil news : राजारामबापुंच्या पुण्यतिथीदिनी विशाल खोले महाराज यांचे 17 रोजी किर्तन

jayant patil news : राजारामबापुंच्या पुण्यतिथीदिनी विशाल खोले महाराज यांचे 17 रोजी किर्तन : वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 41 व्या पुण्य तिथी निमित्त शुक्रवार दि.17 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्यातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प.विशाल खोले महाराज (मुक्ताईनगर) यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन केले आहे.

 

jayant patil news : राजारामबापुंच्या पुण्यतिथीदिनी विशाल खोले महाराज यांचे 17 रोजी किर्तन

यावेळी कारखाना कार्यक्षेत्रातील 101 किर्तनकारांचा माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्याहस्ते सन्मान केला जाणार आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने स्व.बापूंच्या पुतळा परिसरात या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. या कीर्तन सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील केले आहे.

आपल्या राज्याला महान संतांची मोठी परंपरा आहे. आपल्या संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करीत समाजा ला आध्यात्माची गोडी लावली आहे,ती वाढविली आहे. संतांच्या परंपरेला उजाळा देत नव्या पिढीची अध्यात्माची गोडी वाढविण्यासाठी आम्ही या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

माजी मंत्री आणि सुप्रसिध्द वक्ते प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते आणि माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यक्षेत्रातील 101 किर्तनकारांचा सन्मान केला जाईल. हा सोहळा स्व.बापूंच्या पुतळा परिसरात सायंकाळी 5 वाजता संपन्न होईल. यानंतर ह.भ.प.विशाल खोले महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता होईल.

स्व.बापूंच्या पुतळ्याचे पूजन आणि व्याख्यान

दरम्यान सकाळी 7.30 वाजता माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्याहस्ते कारखाना कार्यस्थळावर स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून अभिवादन केले जाईल. यावेळी शिव व्याख्याते प्रशांत देशमुख (रायगड) यांचे ’आजच्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार ’या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी स्व.बापूंच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक जीवना त काम केलेले अँड.बाबासाहेब मुळीक (विटा) हे स्व.बापूंच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.
कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांच्यासह कारखान्याचे संचालक व अधिकारी या सोहळ्याचे जोरदार नियोजन करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज