rajkiyalive

jayant patil news : स्वतःला हुबलाक म्हणणारे गोपीचंद पडळकर हुबलाकचं ः विजय पाटील

राजकीय अपरिपक्वतेमुळे जयंतराव पाटील यांच्यावर टीका

jayant patil news : स्वतःला हुबलाक म्हणणारे गोपीचंद पडळकर हुबलाकचं ः विजय पाटील : नेहमीच आपल्या वाचाळवाणीने राजकारणाचा दर्जा घसरविणारे आ.गोपीचंद पडळकर यांनी काल सांगली येथे एका सत्कार सोहळ्यात स्वतःला हुबलाक अशी उपमा दिली. ते खरोखर हुबलाकचं आहेत हे अनेकदा जाणवले आहे. कालच्या सभेतील भाषणातून पुन्हा एकदा सिध्द झाले. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केली.

jayant patil news : स्वतःला हुबलाक म्हणणारे गोपीचंद पडळकर हुबलाकचं ः विजय पाटील

माजी जि.प.सदस्य संभाजी कचरे, राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक माणिक शेळके, युवक राष्ट्रवादीचे आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, पै.किसन गावडे, उद्योगपती बाबुराव हुबाले, कृष्णेचे संचालक अविनाश खरात, राजारामबापू कारखान्याचे संचालक रमेश हाके, राजारामबापू बँकेचे संचालक आनंदराव लकेसर, राजारामबापू दूध संघाचे संचालक अनिल खरात प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात भाजपाची एकहाती सत्ता असुन देखील आ.जयंतराव पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय यांचे राजकारण चालत नसेल तर आ.जयंतराव पाटील यांच्या नावाचा करिश्मा काय आहे हे दिसून येते.

आ.गोपीचंद पडळकर यांनी मागील काळात आ.जयंतराव पाटील यांनी मंत्रीपदाच्या काळात सांगली जिल्ह्यासाठी काय केले याचा हिशोब मागितला. तुम्ही ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता त्या जत तालुक्यातील वंचित 65 गावांना विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी 6 टीएमसी पाणी जयंतराव पाटील यांनी आरक्षित केले. आटपाडी तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी टेंभु योजनेतुन 8 टीएमसी पाणीसाठा आरक्षीत करण्याचा निर्णय घेतला. पडळकरवाडीच्या शेजारी टेंभु योजनेच्या निंबवडे वितरिकेचे काम देखील आ.जयंतराव पाटील यांनी मार्गी लावले.

कृष्णा काठावरील पुराचे वाहून जाणारे 2.5 टीएमसी पाणी दुष्काळी भागाला दिले.

तुमचे सरकार ज्या माझी शाळा आदर्श शाळा या संकल्पनेचे अनुकरण करीत आहे त्या संकल्पनेचे जनक देखील आ जयंतराव पाटील आहेत. स्मार्ट पीएचसी हा उपक्रम देखील आदर्शवत ठरत आहे. सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन मागील अडीच वर्षांत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांना यांत्रिक बोटी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांना शाळेतच मोफत दाखले, पोलिसांना चारचाकी व दुचाकी वितरण, प्रमुख शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुसज्ज कार्यालय, सांगली शहरात मध्यवर्ती तपासणी केंद्र उभारणी, राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक, कृष्णा नदीवर आयर्विन पुलाला पर्यायी पुल, कृष्णा घाटावर पुरसंरक्षक भिंत असे अनेक प्रकल्प झाले आहेत.

ही कामे थोडक्यात सांगितली आहेत अजून जिल्ह्याची व महाराष्ट्राची यादी अजून खूप मोठी आहे. यावेळी प्रा.शामराव पाटील, राष्ट्रवादीचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, इस्लामपूर शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, माजी अध्यक्ष सचिन कोळी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज