rajkiyalive

jayant patil news : राजारामबापू पाटील कारखान्याच्यावतीने मानधन कुस्ती स्पर्धा

jayant patil news : राजारामबापू पाटील कारखान्याच्यावतीने मानधन कुस्ती स्पर्धा : कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी दि.25 व 26 जानेवारी 2025 रोजी पुरुष व महिलांच्या मानधन कुस्ती स्पर्धा (मॅटवर) आयोजित केली आहे. ही स्पर्धा कारखान्याच्या राजारामबापू कुस्ती केंद्रात होणार आहेत. या स्पर्धेत कार्यक्षेत्रातील पुरुष व महिला मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे.

jayant patil news : राजारामबापू पाटील कारखान्याच्यावतीने मानधन कुस्ती स्पर्धा

पुरुष गटात 14 वर्षाखालील मल्ल 40, 45 व 50 किलो गटात,17 वर्षाखालील मल्ल 55 व 60 किलो गटात,तर खुल्या गटातील मल्ल 65,70,75,80,86,92 व 120 किलो गटात खेळू शकतात. तसेच महिला गटात 14 वर्षाखाली मल्ल 35,40 व 45 किलो गटात, 17 वर्षाखालील मल्ल 50 व 55 किलो गटात,तर खुल्या गटातील मल्ल 61,65,72 व 76 किलो गटात खेळू शकतात. प्रत्येक गटा तील पहिल्या 3 मल्लांना आकर्षक रोख रक्कम बक्षीस दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाचा विजेता मल्ल मानधनास पात्र आहे. मात्र या मल्लास राजारामबापू कुस्ती केंद्रात राहणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे या कुस्त्या खेळविल्या जाणार असून मल्लांनी स्पर्धेस येताना जन्माचा दाखला (बोनाफाईड),आधार कार्ड आणावे. दि.25 रोजी सकाळी 9 ते 12 नांव नोंदणी करून वजने घेतली जाणार आहेत. पंच समितीचा निर्णय अंतिम राहील. ही स्पर्धा कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांच्यासाठी मर्यादीत आहे. स्पर्धेत सहभागी मल्लांनी गैर मार्ग,डोपिंग,अथवा गैरवर्तन केल्यास,तसेच दुखापतीस केंद्र जबाबदार राहणार नाही. प्रत्येक मल्लांने स्वतःच्या जबाबदारीवर स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे.

25 रोजी दुपारी 3 वाजता स्पर्धेचा उदघाटन सोहळा होणार आहे. अधिक माहितीसाठी मो.क्रं.9881550770 व मो.क्रं.8600086957 वर संपर्क करावा. कुस्त्यांच्या प्रेक्षणीय लढती पहाण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे,असे कुस्ती प्रेमींना पाटील यांनी आवाहन केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज