अद्ययावत बीएस-6 बसेसच्या प्रतिक्षेत सांगलीकर
sangli city bus news : 100 बसेस भंगारात; फेर्या घटू लागल्या: खासदार-आमदारांचे दुर्लक्ष : सांगलीच्या राज्य परिवहन मंडळात 75 बसेस भंगारात निघाल्या आहेत. आणखी 30 बसेस भंगारात निघतील, तरी देखील यावर्षी 18 कोटींची अधिक कमाई केली. पण परिवहन मंडळाने सांगलीसाठी नवीन बीएस- 6 प्रणालीची एकही बस दिली नाही. शंभर बसेसचा प्रस्ताव देखील पाठविला आहे. पण उत्पन्न देणार्या सांगलीला प्रतिक्षाच करावी लागत आहे. याबरोबर शिवाई इलेक्ट्रिक बसेस आल्या नाहीत. यासाठी आता सांगलीच्या खासदार व आमदारांनी शासनदरबारी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
sangli city bus news : 100 बसेस भंगारात; फेर्या घटू लागल्या: खासदार-आमदारांचे दुर्लक्ष
सुरक्षित प्रवास हे ब्रीद घेऊन राज्य परिवहन महामंडळाची बस धावते. मागील काही वर्षात एसटीतील प्रवाशी संख्या वाढली असल्याने सध्या महामंडळ नफ्यात आहे. सांगली जिल्ह्यातील एसटी विभागाकडे एसटी बसेसची कमतरता असताना देखील एसटी विभागाने 19 कोटींची अधिक कमाई केली आहे. सांगली विभागाने मागील वर्षी 309 कोटीवरून 329 कोटीपर्यंत उत्पन्नात वाढ केली आहे. पण राज्य परिवहन महामंडळाने सांगली विभाग दुर्लक्षित केला आहे. सांगलीच्या राज्य परिवहन मंडळाला सध्या भंगार बसच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. पंधरा वर्षाचा कालावधी गेल्यानंतर संबंधित बस ही भंगारत काढावी लागते. यामुळे गेल्या वर्षभरात 75 बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. तर पुढील दोन महिन्यात आणखी 30 बसेस भंगारात काढाव्या लागणार आहेत.
अगोदरच बसेसची संख्या कमी आणि भंगार बसचे प्रमाण वाढल्यामुळे आता सांगलीच्या एसटी महामंडळाकडे 690 बसच उरल्या आहेत.
परिणामी बस अभावी बसफेर्यांमध्ये कपात करावी लागत आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या फेर्यांवर याचा परिणाम होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभाग फायद्यात आला आहे. सुरक्षित आणि विना अपघात सेवा देत असल्यामुळे अनेक सवलतीमुळे बसमधून प्रवास करणार्या प्रवाश्याची संख्या ही वेगाने वाढत आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि नादुरुस्त एसटीचे प्रमाण पाहता, सांगली जिल्ह्याला नव्या बसची गरज आहे. तसा शंभर बसेसचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविला असून हा विषय प्रलंबित राहिला आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बीएस- 6 प्रणालीच्या पाच हजार बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात तीनशे गाड्या देखील दाखल झाल्या आहेत. या गाड्या ठाणे, मुंबई, नवीन मुंबई, नाशिक आदी डेपोंना मिळाल्या आहेत. मात्र सांगली डेपोला एकही गाडी मिळाली नाही. या गाड्यांमध्ये फायर एक्सटिग्विशर, बीएस 6 प्रणाली, पुश बॅक सिट्स, पॅनीक बटण, सामान कक्ष, प्रथमोपचार पेटी, आपत्कालिन मार्ग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. पण या गाड्या अद्याप सांगलीच्या डेपोत आल्या नाहीत. याचबरोबर आरामदायी 120 इलेक्ट्रीक बसेस नववर्षात सांगली जिल्ह्यात मिळणार होत्या. त्या देखील बसेस अद्याप आल्या नाहीत. यासाठी खा. विशाल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी शासन दरबारी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
बीएस-6 प्रणालीच्या बसमध्ये काय?
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बीएस- 6 प्रणालीच्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बसेस उपलब्ध झाल्या आहेत. या अद्यावत अशा बसेस आहेत. या बसमध्ये फायर एक्सटिग्विशर, बीएस 6 प्रणाली, पुश बॅक सिट्स, पॅनीक बटण, सामान कक्ष, प्रथमोपचार पेटी, आपत्कालिन मार्ग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.