733 किलोवॅट वीज निर्मिती, जिल्हा नियोजनकडे आणखी 63 प्रस्ताव सादर
sangli local news : सांगली जिल्ह्यात 155 शासकीय इमारती सौर ऊर्जेने झळाळल्या : जिल्हा हरित ऊर्जायुक्त बनवण्यासाठी महावितरण व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा/मेडा) यांच्याकडून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. पारंपरिक वीज बचतीसाठी जिल्ह्यातील 155 शासकीय, निमशासकीय इमारतींवर 733.5 किलोवॅट क्षमतेचे सौर विद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे या इमारती सौर ऊर्जेने झळाळल्या. याशिवाय जिल्ह्यातील 63 शासकीय व निमशासकीय इमारतींना 863 किलोवॅट क्षमतेचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आले आहेत.
sangli local news : सांगली जिल्ह्यात 155 शासकीय इमारती सौर ऊर्जेने झळाळल्या
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. याबाबत महावितरण सांगली ग्रामीणचे प्रभारी अधिक्षक अभियंता सुरेश सवाईराम म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 या योजनेतून जिल्ह्यात 46 ठिकाणी एक हजार 670 एकर जागा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, या योजनेतून जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प जत तालुक्यातील बसर्गी येथे सुरू झाला आहे. या योजनेतून शेतीपंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीजपुरवठा करता येणार आहे.
जिल्ह्यातील 63 शासकीय व निमशासकीय इमारतींना 863 किलोवॅट क्षमतेचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले आहेत. पारंपरिक वीज बचतीकरिता जिल्ह्यातील एकूण 155 शासकीय, निमशासकीय इमारतींवर एकूण 733.5 किलोवॅट क्षमतेचे सौर विद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेतून जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 56 प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता प्रत्येकी 10 किलोवॅट याप्रमाणे एकूण 560 किलोवॅट क्षमतेचे छतावरील पारेषण संलग्न सौरविद्युत प्रकल्प आस्थापित करण्यात येत आहेत. त्यासाठी 4 कोटी 12 लाख रुपयांच्या कामास जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मधून मान्यता देण्यात आली आहे.
मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजनेंतर्गत जिल्ह्यात 3 एचपी, 5 एचपी व 7.5 एचपी क्षमतेचे सौरपंप वितरित करण्यात आले आहेत. या पंपांसाठी सर्वसाधारण लाभार्थीसाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा ठेवला आहे. जिल्ह्यातील अकराशे चाळीस शेतकर्यांनी सौर ऊर्जा पंप बसविले आहेत. उर्वरित अर्जदारांची कामे सुरु आहेत. या योजनेंतर्गत शेतकर्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
56 प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर प्रकल्प
प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेतून जिल्हा परिषद अंतर्गत 56 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी 10 किलोवॅट याप्रमाणे एकूण 560 किलोवॅट क्षमतेचे छतावरील पारेषण संलग्न सौरविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.