rajkiyalive

kavtepiran news : कवठेपिरानमध्ये तीन गव्यांचे दर्शन

शेतकरी, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

kavtepiran news : कवठेपिरानमध्ये तीन गव्यांचे दर्शन : कवठेपिरान (ता. मिरज) येथे शुक्रवारी सकाळी तीन गव्यांचे दर्शन झाले. अचानक आलेल्या गव्यांमुळे गावात खळबळ उडाली. वन विभागाकडून भागात दिवसभर शोधमोहीम करण्यात आली. मात्र सायंकाळी उशिरापर्यत गवे आढळले नाहीत.

kavtepiran news : कवठेपिरानमध्ये तीन गव्यांचे दर्शन

कवठेपिरान-कारंदवाडी रस्त्यावर हॉटेल साईराज शेजारी असलेल्या शेतामध्ये शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेलमधील कामगारांना जनावरं ओरडत असल्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यानंतर समोर तीन गव्यांचा कळप दिसले. चेतक खंबाळे यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र शोध घेण्यासाठी गावात दाखल झाले. मात्र तोपर्यत कवठेपिरानमधून हा कळप तुंग, कसबे डिग्रजमधील शेतात गेले, अशी माहिती काही शेतकर्‍यांनी दिली.

वन विभागाकडून या भागात दिवसभर शोध सुरू होती. मात्र रात्री उशिरापर्यत गवे सापडले नाहीत. गव्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. यापूर्वी या भागात बिबट्या, तरस आणि गवे आले होते. चांदोली अभयारण्यातून हे गवे आले असावेत असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज