dudhgaon news : दुधगाव मध्ये पंचकल्याणक महोत्सवात अडीच तोळ्यांचे दागिने केले लंपास. : मिरज तालुक्यातील दुधगाव येथील पंचकल्याणक पूजेच्या ठिकाणी चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळयाचे सोन्याचे गंठन शिताफीने लंपास केले. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात शकुंतला शशिकांत पाटील (वय 65, रा. बोलवाड, ता. मिरज, सध्या दुधगाव) यांनी फिर्याद दिली आहे. चोरीची घटना गुरुवार दि. 8 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
dudhgaon news : दुधगाव मध्ये पंचकल्याणक महोत्सवात अडीच तोळ्यांचे दागिने केले लंपास.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दुधगाव येथील जुना शिगाव वाट रस्ता परिसरात पंचकल्याणक पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे भाविकांची गर्दी आहे. याठिकाणी बोलावाड येथे राहणार्या शकुंतला पाटील या गेल्या होत्या. दुपारी बारा ते साडे बारा वाजण्याच्या सुमारास पूजा झाल्यानंतर प्रसाद घेवून बाहेर असताना फिर्यादी शकुंतला पाटील यांच्या गळ्यातील गंठन चोरट्याने शिताफीने लांबविले. काही वेळानंतर हा प्रकार शकुंतला यांच्या निदर्शनास आला.
dudhgaon-news-two-and-a-half-tolas-worth-of-jewellery-was-looted-during-the-panchakalyanak-festival-in-dudhgaon
त्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र चोरीचा उलगडा न झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.