sangli crime news सांगलीतील सह्याद्रीनगर मध्ये गुंडाचा दगडाने ठेचून खून

SHARE:

sangli crime news सांगलीतील सह्याद्रीनगर मध्ये गुंडाचा दगडाने ठेचून खून शहरातील सह्याद्रीनगर परिसरातील मंगळवार बाजार परिसरात रेकॉर्डवरील गुंडावर धारधार हत्याने हल्ला करून दगडाने ठेचण्यात आले. त्यात डोक्यावर वर्मी घाव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मुबारक उर्फ पुलवा हसीउल्ला सहा (वय ३७, रा. प्रकाशनगर, कुपवाड) असे त्याचे नाव आहे. भर दुपारी झालेल्या घटनेने खळबळ उडाली. दरम्यान, किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सहा ते नऊ जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

sangli crime news सांगलीतील सह्याद्रीनगर मध्ये गुंडाचा दगडाने ठेचून खून

भरदुपारी घटना; किरकोळ वादातून कृत्य; टोळक्याकडून हल्ला. 

पोलिसांनी व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, की मुबारक सहा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो प्रकाशनगर परिसरात राहण्यास असून भंगार व्यवसायिक आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास सह्याद्रीनगर येथील हॉटेल रत्नामध्ये आले होते. त्याच्यासोबत मित्रही अजरुद्दीन इनामदार हा देखील होता. दुपारी साडेचारच्या सुमारास सह्याद्रीनगर येथील रिक्षा थांब्याजवळ आले.
त्याठिकाणी बाकड्यावर दोघेजण बसले होते. त्यावेळी संशयितही त्याठिकाणी आले. संशयित आणि मुबारक यांच्या किरकोळ वादातून वाद झाला. त्या वादातून एका संशयिताने एडक्यासारख्या धारधार हत्याराने हातावर हल्ला केला. आरडाओरडा करत मुबारक हा तेथून पश्‍चिमेला (रेल्वे स्टेशन)च्या बाजूला पळत सुटला. त्यावेळी एका प्रार्थनास्थळासमोर दुचाकीवरून गाठले. संशयितांनी त्याला दगडाने ठेचले. दगडाचा घाव इतका वर्मी होता की रक्ताच्या थारोळ्यात मुबारक पडला. सदरची सर्व घटना नागरीकांनी पाहिली. त्यानंतर संशयितांनी दुचाकीवरून पळ काढला.

दरम्यान, भागातील नागरीकांनीच १०८ रूग्णवाहिकेस बोलावले. परंतू मुबारक याच्या डोक्यात गंभीर धाव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने घटनास्थळी पंचनामा केला. मृत मुबारक या भावाची फिर्याद नोंदवून घेतली. संशयिताच्या शोधासाठी एलसीबीसह स्थानिक पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. भर दुपारी झालेल्या घटनेने खळबळ उडाली.

खुनाचा थरार सीसीटीव्हीत कैद… 

मृत मुबारक यास मारहाण करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी मारल्याचे स्पष्ट झाले. परंतू आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मृत मुबारक हा एका रेकॉर्डवरील गुन्हेगार असून कुख्यात गुंडाच्या टोळीत त्याचा सहभाग होता. हाच काटा काढण्यासाठी दुसऱ्या गुंडाच्या टोळीने हल्ला केल्याची चर्चा परिसरात होती. पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत. हल्लेखोरांपैकी काही जण रेकॉर्डवरील आरोपी आहेत. त्यापैकी एक जण नुकताच मोका कारवाईतून जामिनावर बाहेर आला होता. यातून आता टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *