rajkiyalive

islampur crime news : इस्लामपुरातील महिलेच्या खुनातील संशयित पोलिसांच्या ताब्यातून पळाला :

तासाभरात मिरज रेल्वे जंक्शनवरून आवळल्या मुसक्या.

islampur crime news : इस्लामपुरातील महिलेच्या खुनातील संशयित पोलिसांच्या ताब्यातून पळाला :: सांगली : इस्लामपूर येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीने आज पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली, मात्र आपली ही मर्दुमकी गावात सांगण्यासाठी त्यानं मोबाईलवरून एकाशी संपर्क साधला. हीच त्याची चूक ठरली अन् तासाभरात त्याच्या हातात पुन्हा बेड्या पडल्या. मिरज रेल्वे स्थानकावरून परागंदा होण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली. मुवाज ईलाही मुलाणी (21, रा. इस्लामपूर) असे त्याचे नाव आहे.

islampur crime news : इस्लामपुरातील महिलेच्या खुनातील संशयित पोलिसांच्या ताब्यातून पळाला :

याबाबत अधिक माहिती अशी, की चैनीसाठी पैसे मिळवण्याच्या हेतूने वृद्धेच्या गळ्यातील व नाकातील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या हेतून मुलाणी वृद्धेचा खून केला होता. खुनाच्या घटनेत कोणतेही पुरावे हाती नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने दोन दिवसापुर्वी त्याला गजाआड केले. त्याच्या वैद्यकीय कारणास्तव त्याला न्यायालयीन कोठडीही आज सुनावण्यात आली. संशयित मुलाणी याला आज येथील मध्यवर्ती कारागृहात सोडण्यात येणार होते. त्यासाठी इस्लामपूर पोलिस त्याला घेवून आले होते.

दरम्यान, कारागृहाच्या दारातच अनेक वैद्यकीय कारणे तो देवू लागला. त्यावेळी त्याची औषधे आणण्यासाठी म्हणून बाहेर थांबवण्यात आले होते. तेवढ्यात मुलाणी याने पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली. त्यामुळे खळबळ उडाली. इस्लामपूर पोलिसांची चांगलीच दमछाक सुरू झाली. दुसर्‍या बाजूला त्याचवेळेत शहरात पोलिसांचा रूट मार्च सुरू होता. त्यामुळे सर्व पोलिस त्यात व्यस्त होते. मुलाणी हा पळ काढत कसातरी मिरज रेल्वेस्थनकावर पोहचला.

islampur-crime-news-suspect-in-islampur-womans-murder-escapes-from-police-custody

त्याठिकाणी एकाच्या मोबाईलवरून त्याने गावात फोन लावत आपली मर्दुमकी सांगितली आणि हीच टीप स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली. इस्लामपूर पोलिस त्याच्या मागावर होतेच. तो मिरज रेल्वेस्थानकावर असल्याची माहिती मिळताच पथक त्याठिकाणी गेले. शिताफीने त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या, मात्र, यंत्रणेचा भोंगळ कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. कारागृहात सोडण्यासाठी येणार्‍या पोलिस अंमलदजारांची खातेनिहाय चौकशी होईल, असे सुत्रांनी सांगितले खरे. पण, एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ने-आण करताना होणार्‍या निष्काळजीपणावर अधीक्षक संदीप घुगे कोणती कारवाई करणार हे यथावकाश समोर येईल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज