rajkiyalive

sangli news : विधानसभेनंतर सांगली जिल्ह्यात 26 हजार मतदार वाढले

sangli news : विधानसभेनंतर सांगली जिल्ह्यात 26 हजार मतदार वाढले: विधानसभा निवडणूकीनंतर जिल्हयात मागील सहा महिन्यात तब्बल 26 हजार मतदारांची वाढ झाली आहे. विधानसभा निवडणूकीवेळी जिल्ह्यात 25 लाख 6 हजार 065 इतकी मतदारांची संख्या होती. ती आता 25 लाख 62 हजार 547 पर्यंत पोहचली आहे. यात सांगली विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या लक्षणिय आहे. सांगली विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या 3 लाख 61 हजार 305 इतकी झाली आहे.

sangli news : विधानसभेनंतर सांगली जिल्ह्यात 26 हजार मतदार वाढले

 सांगली विधानसभा मतदार संघात सर्वाधिक साडे तीन लाखांवर मतदार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे पडधम वाजू लागले आहेत. त्यामुळे सहाजिकच मतदारांच्याकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निवडणूक विभागाकडून नवमतदारांच्या नोंदणीवर अधिक भर देण्यात आला आहे. गत वर्षी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीपूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. मतदारांची नोंदणी, जनजागृती करण्यात आली. जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी मोठ्या प्रमाणावर नव मतदारांची नोंदणी झाली.

विधानसभा निवडणूकीवेळी जिल्ह्याची मतदार संख्या 25 लाख 36 हजार 065 इतकी होती. यामध्ये 12 लाख 82 हजार 276 पुरुष तर 12 लाख 53 हजार 639 महिला मतदार होते. निवडणूकीनंतर आता सहा महिन्याचा कालवधी लोटला आहे. या काळात आणखी 26 हजार 400 मतदारांची भर पडली आहे. जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 25 लाख 62 हजार 547 पर्यंत पोहचली आहे. यामध्ये सर्वाधिक सांगली विधानसभा मतदार संघातील 3 लाख 61 हजार 305 मतदारांचा समावेश आहे. मतदार नोेंदणीची प्रक्रिया सुरुच आहे. यासह स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचीही प्रक्रिया सुुर आहे.

sangli-news-26-thousand-more-voters-in-sangli-district-after-the-assembly-elections

तृतीयपंथी मतदारांमध्येही वाढ

पुरुष, महिलांप्रमाणे तृतीयपंथीय मतदारांचीही नोंदणी सुरु आहे. सांगली विधानसभा मतदार संघामध्ये सर्वाधिक 72 तृतीयपंथी मतदार आहेत. मिरज 29, इस्लामपूर 9, शिराळा, पलूस-कडेगाव 9, खानापूर 19, तासगाव-कवठेमहांकाळ 3 व जत विधानसभा मतदार संघामध्ये 3 तृतीयपंथी मतदार आहेत.

विधानसभा मतदार संघ मतदार संख्या
मिरज 348876
सांगली 361305
इस्लामपूर 282911
शिराळा 309274
पलूस-कडेगाव 294095
खानापूर 355245
तासगाव-कवठेमहांकाळ 315577
जत 295264
एकूण 2562547
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज