sangli yoga news : सांगलीत टाळ, मृदंगाच्या निनादात साडेपाच लाख लोकांनी केला योगा : जागतिक योगा दिनानिमित्त सांगलीकरांनी शनिवारी आणखी एका विक्रमात भर घातली. टाळ, मृदंगाच्या निनादात, विठ्ठल नामाच्या गजरात भक्ती योगात साडेपाच लाखांवरील नागरिकांनी योगा केला. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम यासह सुमारे 1600 ठिकाणाहून ऑनलाईनद्वारे आभासी पध्दतीने नागरिक सहभागी झाले होते. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक रेकॉर्डस् इंडिया, एशिया वर्ल्ड बुक रेकॉर्डस् आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे.
sangli yoga news : सांगलीत टाळ, मृदंगाच्या निनादात साडेपाच लाख लोकांनी केला योगा
नव्या विश्वविक्रमाची नोंद
सांगली जिल्हा परिषद, चितळे दूध डेअरी आणि विश्वयोग दर्शन केंद्र सांगली-मिरज यांच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर झालेल्या भक्तीयोग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खा. विशाल पाटील, माजी मंत्री आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप नेत्या श्रीमती जयश्री पाटील, मकरंद देशपांडे, उद्योजक मनोहर सारडा यांच्यासह मोठ्या संख्येने सांगलीकर या उपक्रमात भक्ती योग उपक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी अनेकजण वारकरीही पारंपारिक वेषात या उपक्रमात सहभागी झाले होते.
त्यांनी टाळ, मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात विठ्ठलमय वातावरणात निर्माण केले. या भक्तीमय वातावरणात योग विशारद डॉ. बाळकृष्ण चिटणीस यांनी ओघवत्या शैलीत आसनांची माहिती दिली आणि शास्त्रोक्त पध्दतीने आसने करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योग अभ्यास केला.
या उपक्रमाचे निरीक्षण आणि विश्लेषण करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे अनिकेत वाकणकर आणि चंदीवाल, इंडिया आणि एशिया वर्ल्ड रेकॉर्डचे निरीक्षक नचिकेत जामदार उपस्थित होते. त्यांनी उपक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्क्रीनवर लक्ष ठेऊन हा उपक्रम योग्य रितीने होत आहे का याची पाहणी केली. उपक्रम संपताच त्यांनी हा प्रत्यक्ष आणि आभासी पध्दतीने झालेला विक्रम नोंद झाल्याचे जाहीर केले. हा उपक्रम पार पडल्यानंतर जागेवरच या विक्रमाची नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना प्रदान करण्यात आले.
याबाबत रेकॉर्ड बुकच्या प्रतिनिधीनी सांगितले की, रेकॉर्ड करण्यासाठी आधी नोंदणी करावी लागते.
त्यानंतर त्याच्या सर्व निकषांची पुर्तता करावी लागते. त्यावेळीच प्रमाणपत्रही तयार केले जाते. त्यांनतर प्रत्यक्ष उपक्रमावेळी त्याचे निरीक्षण करुन निकषानुसार तो पुर्ण झाला की लगेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. मात्र निकषात पुर्ण झाला नाही तर प्रमाणपत्र दिले जात नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, प्रमोद काळे, अधिक्षक अभियंता संजय येवले, श्रीमती भारती बिराजे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सांगलीकरांसाठी अभिमानास्पद: ना. जयकुमार गोरे
सांगली जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तमाम योगप्रेमींनी आज योगदिन उत्साहात साजरा केला. आभासी पध्दतीने 1600 ठिकाणी हा कार्यक्रम झाला. यात सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले. या सर्व योगसाधकांचे अभिनंदन करतो. या उपक्रमाची वर्ल्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. सांगलीकरांसाठी हे अभिमानास्पद असल्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
sangli-yoga-news-five-and-a-half-lakh-people-did-yoga-in-sangli-to-the-tune-of-tal-mridangam
जिल्ह्याची नवी ओळख निर्माण झाली: तृप्ती धोडमिसे
विश्व योग दिन व जागतिक संगीत दिनानिमित्त जिल्ह्याने अनोख्या पद्धतीने वारकरी तालावर योग हा नवीन उपक्रम राबवला. यामुळे तीन रेकॉर्ड झाले आहेत. वारकरी तालावर योगामध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान यासोबत आरोग्यासाठी योग ही संकल्पना राबवली. जागतिक संगीत दिनानिमित्त या उपक्रमाचे जे संगीत होते ते पुर्णपणे नवीन होते, ते सांगलीत तयार झाले आहे. सांगितिक योगा, वारकीर तालावर योगा हा नवीन उपक्रम होता. या उपक्रमातून सांगली जिल्ह्याची नवी ओळख निर्माण झाली असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











