राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रिल्स स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. हे स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे.
Pratik patil news : प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रिल्स स्पर्धेचे आयोजन
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मिडियाच्या वतीने स्पर्धेचे संयोजन करण्यात येत आहे.
स्पर्धेतील प्रथम विजेत्यास रु.२५ हजार १,दुसऱ्या विजेत्यास रु.२० हजार १,तिसऱ्या विजेत्यास रु.१५ हजार १,तर ७ उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रु.३ हजार १ बक्षिस दिले जाणार आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस दिले जाणार आहे.
स्पर्धेचे विषय-१.युवा नेते प्रतिकदादा पाटील यांचे कृषी,आरोग्य व उद्योग आदी क्षेत्रातील कार्य,२.माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे वाळवा तालुक्यातील कार्य, ३.युवा नेते प्रतिकदादा पाटील यांना वाढ दिवसाच्या अनोख्या शुभेच्छा. प्रत्येक व्हिडीओ हा ३० सेकंद ते २ मिनिटांचा असावा,रिल सोलो किंवा ग्रुप घेऊन करू शकता,हा व्हिडीओ कोणाच्या भावना दुखविणारा नसावा.
गुगल फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
तालुका उपाध्यक्ष विशाल माने, रविकिरण बेडके,सौरभ सावंत,सूर्यकांत पाटील, प्रतिक पाटील,श्रेयस चिवटे,जगन्नाथ पाटील,सागर फारणे व सोशल मिडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संयोजन करीत आहेत. अधिक माहिती साठी- मो.क्र.७३७३२०१९१९ वर संपर्क करावा,असे संयोजकांनी आवाहन केले आहे

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.