vijaynagar sxhool news : विजयनगरची शाळा – जिल्हा परिषदेतून भविष्याकडे वाटचाल करणारी एक रोषणाई!

SHARE:

vijaynagar sxhool news : विजयनगरची शाळा – जिल्हा परिषदेतून भविष्याकडे वाटचाल करणारी एक रोषणाई!: सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत असताना मिरज तालुक्यातील विजयनगरची शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही एक आदर्श शाळा ठरावी असे काम या शाळेचे सुरू आहे. गावातील आणि परिसरारील प्रत्येक विद्यार्थ्यांला या शाळेत प्रवेश मिळावा, अशी इच्छा शाळा पाहिल्यानंतर होते.

vijaynagar sxhool news : विजयनगरची शाळा – जिल्हा परिषदेतून भविष्याकडे वाटचाल करणारी एक रोषणाई!

थांबा…! ही आहे जिल्हा परिषदेची शाळा.
पाटीवर ’सरकारी शाळा’ लिहिलं असलं तरी आत पाऊल टाकताच वाटतं -जणू शिक्षणाचं एक स्वप्न साकार झालंय
जणू तंत्रज्ञान आणि ज्ञान यांचं संगमस्थळ इथंच उगम पावतंय

ही आहे – विजयनगर जिल्हा परिषद शाळा, जिच्या दारातून आत शिरलं की दिसतो एक नवीन भारत – साक्षर, सक्षम, आणि स्मार्ट! हायटेक संगणक लॅब – शिक्षणाच्या भविष्यातलं प्रवेशद्वार! या शाळेतील लॅब म्हणजे केवळ संगणकांचा संच नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उभारलेलं ज्ञानमंदिरच. प्रत्येकाला स्वतंत्र संगणक,रिव्होल्विंग चेअरवर बसून काम करणारा विद्यार्थी, प्रत्येकाच्या हातात स्क्रीन टच पॅनल आणि त्यासाठी डिजिटल पेन,
हे दृश्य खाजगी शाळांच्या देखील पुढे गेलेलं आहे.

सर्व संगणक शिक्षकाच्या संगणकाशी जोडलेले आहेत – शिक्षक विद्यार्थ्यांचं काम एका क्लिकवर पाहतात,
पो़डियमवरून असाइनमेंट देतात, सामोरे असलेला इंटरक्टिव्ह स्मार्ट बोर्ड म्हणजे शिक्षणाला मिळालेली एक नवदृष्टी!
कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स – गावातच भविष्याशी संवाद!

कोण म्हणतं गावात राहणारी मुलं मागं राहतात? आज विजयनगरची ही शाळा Aख आणि ठेलेींळली चे धडे गावातच देत आहे. विद्यार्थ्यांना रोबो तयार करताना पाहणं हे केवळ कौतुकाचं नाही, तर ते ग्रामीण भारताच्या नव्या शक्यतांचं दर्शन घडवतंय!

पी.एम. श्री – ग्रामीण भागात शिक्षणाचं तेजस्वी स्वप्न! शासनाच्या पीएम श्री या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे,
गावागावांतल्या शाळांमध्ये उजेडाची पहाट झाली आहे. ही योजना म्हणजे मुलांना भविष्याच्या दारी नेणारी वाट…
जिच्या बळावर विजयनगरची शाळा आज एक आदर्श ठरत आहे.

हा यशाचा प्रवास केवळ निधीचा नव्हे, तर कृतीशीलतेचा आहे!

या यशामागे आहेत –
मा. आ. सुरेश (भाऊ) खाडे साहेब,
माजी जि.प. अध्यक्षा सौ. प्राजक्ता नंदकुमार कोरे,
मा. राजू (भाऊ) कोरे,
सरपंच दीपाली कुल्लाळ,
उपसरपंच रजिया मुल्ला,
ग्रामपंचायत सदस्य,
आणि मुख्याध्यापक व शिक्षकांचा जिवलग प्रयत्न!

त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि संकल्पशक्तीमुळे आज शाळा ही केवळ वर्गखोली न राहता एक डिजिटल ज्ञानसंस्कृती केंद्र झाली आहे.

ही शाळा फक्त शिकवते नाही, ती घडवते!

शिकवणं हे काम असतं पण घडवणं ही जबाबदारी असते. विजयनगरची जिल्हा परिषद शाळा आज ही जबाबदारी व्रतासारखी पार पाडतेय. कदाचित, उद्या या शाळेतूनच कुणी वैज्ञानिक, उद्योगपती, शास्त्रज्ञ किंवा देशदूत घडेल
आणि तेव्हा सगळं जग थक्क होऊन म्हणेल – हे घडलं गावातल्या त्या छोट्याशा शाळेत!

शाळेचं नाव – जिल्हा परिषद शाळा, विजयनगर तालुका – मिरज, जिल्हा – सांगली भविष्यासाठी उभारलेली एक प्रेरणादायी मशाल!

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *