vishal patil on padalkar : वसंतदादांच्या योगदानाबाबत पडळकरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही ः खा. विशाल पाटील

SHARE:

vishal patil on padalkar : वसंतदादांच्या योगदानाबाबत पडळकरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही ः खा. विशाल पाटील : आ. गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य सांगलीच्या संस्कृती, परंपरेला शोभणारी नाहीत. जिल्ह्यात काही लोकांकडून जी वक्तव्य होत आहेत, त्याच्या मागे कोण आहे, बोलणार्‍या व्यक्तीला फूस, मोकळीक कोणी दिले आहे, हे पहायला पाहिजे, असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे राज्याच्या विकासामध्ये काय योगदान आहे, याचे सर्टिफिकेट पडळकरांकडून घेण्याची गरज नाही.

vishal patil on padalkar : वसंतदादांच्या योगदानाबाबत पडळकरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही ः खा. विशाल पाटील

आ. पडळकरांना फूस कुणाची शोधावे लागेल

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत खासदार पाटील आले असता, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या विरोधात त्यांनी प्रतिक्रिया दिली. आ. पडळकर यांनी केलेले वक्तव्य सांगलीच्या परंपरेला शोभेल असे नाही. त्यांचा स्वभाव असेल तर समजून घेवू. ते काय बोलतात, त्यांना फूस कुणाची आहे, मोकळीक कुणी दिली याच्या मागे जावे लागेल. राज्याला सुसंस्कृत परंपरा आहे. राज्याचे नेतृत्व करणारे स्वतःची प्रतिमा स्वच्छ दाखवत असतील आणि त्यांच्या भोवतालची जवळची समजणारी माणसं अशी भाषा करीत असतील तर त्यांचा खरा चेहरा समोर येतो.

ते म्हणाले, वसंतदादा आणि राजारामबापू पाटील यांच्यातील वाद हा राजकीय आणि वैचारिक होता. या जिल्ह्याने तो संघर्ष पाहिला आहे. दादा आणि बापूंची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. राजकारणात कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद असतो. जयंत पाटील यांच्या वागण्याची पद्धत आम्हांला आवडत नसेल त्यामुळे वैचारिक वाद होत असतो.

vishal-patil-on-padalkar-no-need-for-padalkars-certificate-regarding-vasantdadas-contribution-kha-vishal-patil

दिवगंत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे राज्याच्या विकासात काय योगदान हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. कुणी काय बोलत असेल तर त्यांचा बालिशपणा आहे. दादांच्या योगदानाबाबत पडळकरांच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याची टीकाही खासदार पाटील यांनी केली.

जिल्ह्याची नव्हे राज्याची चिंता वाटते
राज्य नेतृत्वाचा दाखवायचा चेहरा वेगळा आणि खरा चेहरा वेगळा आहे. जिल्ह्यातील भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला, हे दुर्दैव आहे. राजकीय संघर्ष होत राहणार मात्र खालच्या भाषेत केली जाणार्‍या व0क्तव्याची परंपरा सुरुच राहिल्यास जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याची चिंता वाटते, असे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *