iswarpur election news : ईश्वरपूरमधील प्रभाग सात दहशतीतून मुक्त करणार : जयंत पाटील : या प्रभागातील जनता गेल्या 15 वर्षापासून दादागिरी आणि दहशतीच्या छायेत वावरत आहे. या दादागिरी आणि दहशतीतून मुक्त होण्यासाठी आणि या प्रभागातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही समर्थ व सक्षम उमेदवार दिले आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,असे आवाहन माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी हनुमाननगर येथील जाहीर कोपरा सभेत बोलताना केले.
iswarpur election news : ईश्वरपूरमधील प्रभाग सात दहशतीतून मुक्त करणार : जयंत पाटील
संग्राम पाटील हा आमचा ढाण्या वाघ आहे. तो या प्रभागात आता कोणाची दादागिरी आणि दहशत चालू देणार नाही,तो तुमची नम्र आणि प्रामाणिक सेवा करेल,असा विश्वासही व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार संग्राम दिलीपराव पाटील आणि सौ.पल्लवी राहुल नागे,तसेच प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार,माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी,सौ.रेखाताई जाधव यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,खंडेराव जाधव,संचालक हणमंत माळी,शैलेश पाटील, राहुल मागे,मालन वाकळे,सूर्याजी पाटील,गुरुराज माने,मोहन भिंगार्डे,किरण पाटील,धनाजी देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,या प्रभागातील जनतेला दादागिरी आणि दहशतीच्या छायेतून मुक्त होण्याची ही संधी आहे. आपण कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता,निर्भयपणे आपल्या उमेदवारांना विजयी करा. बाकीची कोणतीही चिंता करू नका. आम्ही येत्या पाच वर्षात आपल्या प्रभागात गेल्या 15 वर्षातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावू. संग्राम पाटील यांच्या कुटुंबास जनतेच्या सेवेची,निष्ठेची आणि बेडर पणाची मोठी परंपरा आहे.
आम्ही या निवडणुकीत आम्ही तरुण,शिकलेल्या,तसेच अनुभवी माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांना उमेदवार म्हणून संधी दिली आहे.
संग्राम पाटील म्हणाले,समोरचा उमेदवार गेल्या 15 वर्षापासून या भागात नगरसेवक आहे. मात्र त्यांनी जनतेची नम्र सेवा करण्याऐवजी या भागातील जनतेवर अन्याय – अत्याचार केला आहे. मात्र इथून पुढे या भागात कोणाची दादागिरी चालणार नाही. येत्या दोन तारखेस समोरच्या उमेदवाराच्या साम्राज्याच्या लंकेचे दहन केल्याशिवाय राहणार नाही.
मला म्हणतात,हा उमेदवार बाहेरचा आहे. समोरचा उमेदवार तानाजी चौकात राहतो. मात्र माझे घर येथून हाकेच्या अंतरावर आहे. मग मी बाहेरचा कसा? मी व सौ.पल्लवी मागे यांना विजयी करा. हा प्रभाग माझे कुटुंब समजून आपली सेवा करू.
सौ.पल्लवी राहुल नागे म्हणाल्या,माझे पती गेल्या अनेक वर्षापासून आपली सेवा करीत आहेत. त्यांनी कोणतेही पद नसताना आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. माझ्या पतीच्या कामाची कामाची पोच म्हणून मला आपल्या सेवेची संधी द्यावी.
यावेळी माजी नगरसेवक खंडेराव जाधव,संचालक शैलेश पाटील,सूर्याजी पाटील,मोहन भिगार्डे यांनीही भाषणे केली.
यावेळी भीमराव पाटील,निवास पाटील, शंकरराव चव्हाण, रोझा किणीकर,कमल पाटील, योगिता माळी यांच्यासह या प्रभागातील स्त्री – पुरुष,युवक तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











