zp news : जिल्हा परिषदेत आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील : जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत भाजप आणि घटक पक्षांची आता कोणतीही बैठक झाली नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. प्रत्येकाला आपला अध्यक्ष आणि पदाधिकारी व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे पुढे काय होतंय ते बघूया असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
zp news : जिल्हा परिषदेत आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
भाजप कोणत्याही कर्तृत्ववान माणसाला फारवेळ वेटिंग करायला लावत नाही असे म्हणत आ. गोपीचंद पडळकर यांच्या मंत्री पदाबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले.
सांगलीतील तरुणभारत व्यायाम मंडळातर्फे आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी पालकमंत्री पाटील आले असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले, तरुण भारत व्यायाम मंडळाला 96 वर्षे पूर्ण झाली आहेत. शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. खूप अनोखा उपक्रम ते दरवर्षी करतात. अतिशय नेटके नियोजन देखणे नियोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शंभरीच्या दृष्टीने त्यांनी प्लॅन तयार करावा आम्ही मदत करू अशी ग्वाही दिली.
पुढे ते म्हणाले, जिल्हा परिषद सत्तेबाबत कोणतीही बैठक झाली नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. प्रत्येकाला आपला अध्यक्ष आणि पदाधिकारी व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे पुढे काय होतंय ते बघूया. भारत पाकिस्तान युद्धामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही भूमिका बजावली नाही. एकूणच पुरेसा बदल घेतल्यानंतर युद्ध लवकर संपवायचे असते त्याप्रमाणे युद्ध थांबवले.
यात डोनाल्ड ट्रम्प यांनी काही सांगितलं नाही. संजय राऊतांना चंद्र, सूर्य आणि मंगळ या विषयांवरच बोलायचं बाकी राहिले आहे. आश्चर्य वाटते कि ते सगळ्या विषयांवर ठाम भूमिका मांडतं असतात असा टोला त्यांनी यावेळी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार युद्धजन्य परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. ज्या ज्या वेळेला अशी स्थिती निर्माण झाली त्यात्या वेळेला परदेशात अडकलेल्या नागरिकांना आपण सुखरूप भारतात आणले आहे.
जगामध्ये भारताची स्थिती चांगली आहे, भारताच्या शब्दाला वजन आहे. त्यामुळे यावेळीही सर्वांना सुखरूप बाहेर काढू अशी ग्वाही दिली. महाराष्ट्र केसरी आंदोलनाबाबत ते म्हणाले, राज्य सरकारने अशा विषयात कोणताही हस्तक्षेप करू नये, त्यात्या क्षेत्रातील मंडळी सक्षम असतात ते त्यांचे प्रश्न सोडवतात असे म्हणत बोलणे टाळले.
गोपीचंद पडळकर हे महाराट्रातील असं नेतृत्व आहे कि ज्यांना व्यक्तिमत्व चांगले आहे. त्यांना वक्तृत्व चांगले आहे, धडाडी आहे. राजकारणात टायमिंग साधन हे गोपीचंद पडळकर यांना व्यवस्थित जमत. भाजप कोणत्याही कर्तृत्ववान माणसाला फारवेळ वेटिंग करायला लावत नाही असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
विशाल येतील तेंव्हा येतील, या म्हणायला काय अडचण..
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज खा. विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली. याबाबत बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, काशीस जावे नित्य वदावे, त्यांना जायचंय तेंव्हा जावे पण नुसतं जायचं आहे जायचं आहे. विशाल पाटील येतील तेंव्हा येतील तोपर्यंत या या म्हणायला काय अडचण आहे. त्यांनी असा कधी कायमचा तुकडा पाडला नाही त्यामुळे बोलावण्यात काय हरकत असल्याचे सांगत त्यांनी भाजपचे दरवाजे उघडे असल्याचे सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











