walwa murdar news : वाळव्यात पूर्ववैमन्यातून दगडाने ठेचून तरुणाचा खून : रविवारी पहाटे वाळवा – आहिरवाडी रस्त्यावर असणार्या देसाई प्लॉट येथे पूर्ववैमनस्यातून तिघा जणांनी संगणमत करून,दारू पाजून. काठीने मारून व दगडाने ठेचून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या संदेश उर्फ साहिल अशोक कदम व य 30 वर्षे रा. वाळवा याचा निर्घृण खून केला.
walwa murdar news : वाळव्यात पूर्ववैमन्यातून दगडाने ठेचून तरुणाचा खून
मयत साहिल याचे वडील अशोक भीमराव कदम यांनी आष्टा पोलिस ठाण्यात आरोपी प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी, राजश्री आमसिद्ध कोळी, अक्षय हनुमंत मुळीक यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंद झाला असून आरोपींना आष्टा पोलिसांनी अटक केली आहे.
अशोक कदम यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा संदेश ऊर्फ साहिल कदम याचे त्याचा मित्र प्रथमेश ऊर्फ बबलु आमसिध्द कोळी याचे घरी जाणे येणे होते तेथे मुलगा साहिल, प्रथमेश कोळी, त्याची आई राजश्री कोळी, अक्ष मुळीक, मुळीक, अभिजीत ऊर्फ सोन्या टुमक्या परिट, असे एकत्र बसुन दारु पित असायचे. दारु पिल्यानतर त्यांचे एकमेकांसोबत वाद होत होते. साहिल याला प्रथमेश कोळी यांचे घरी दारु पित असले ठिकाणी वरील मुलांनी मारहाण केली होती. साहिलला झालेल्या मारहाणीबाबत तक्रार देण्यासाठी तो पोलीस ठाण्याला गेल्यावर प्रथमेशची आई राजश्री हिने त्याला माझ्या
मुलाविरुध्द तक्रार केली तर मी तुझ्या विरुध्द माझ्यावर जबदरस्ती केल्याची तक्रार देणार असा दम दिल्याने साहिल याने पोलीस ठाण्यात तक्रार दिलीच नाही. शनिवार 28 मार्च रोजी रात्री दहा वाजणेच्या सुमारास वाळवा येथील एम.एस.ईबी. टॉवर जवळ साहिल याचे प्रथमेश कोळी, अभीजीत ऊर्फ सोन्या टुमक्या परिट व त्याचे मिंत्राचे दारु पिऊन भाडण झाल्याचे गावातील लोकांकडुन समजले होते.
रविवारी 29 रोजी सकाळी 06.30 वा. चे सुमारास मी आमचे वाळवा ते अहिरवाडी रोडला असलेले शेतामध्ये जाण्यासाठी निघालो असता देसाई प्लॉट रॉयल हॉटेलच्या जवळ लोकांची गर्दी दिसली. त्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊन पाहिले तेंव्हा साहिल याचे तोंडावर व डोक्यात मोठ्या जखमा होऊन त्याचा खुन केल्याचे दिसले.
त्याचेजवळ एक रक्त लागलेला दगड होता. थोड्या अंतरावर राजश्री कोळी यांचे घर आहे त्या घरामध्ये मी जाऊन पाहिले तेव्हा तीच्या घरात खालील बाजुस रक्त होतं व कळकाची काठी होती. त्यावरुन साहिल याला राजश्री कोळी हिचे घरामध्ये बोलावुन प्रथमेश कोळी, त्याचा मित्र सोन्या टुमके, व राजश्री कोळी, रा. वाळवा यांनी पुर्वी झालेल्या भांडणाचे कारणांवरुन कळकाचे काठीने, दगडाने डोक्यात मारुन त्याचा निर्घुनपणे खुन करुन त्याला राजश्री कोळी यांचे घराचे बाहेर थोड्या अंतरावर नेऊन टाकले आहे.
आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाल्याच्या बातमीने वाळव्यात खळबळ उडाली. साहिल याच्या नावावरती आष्टा व भिलवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यातही आले होते. खून झालेल्या संदेश ऊर्फ साहिल कदम हा सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्या विरोधात खून, गंभीर दुखापत, गर्दी – मारामारी, तडीपारी कायद्याचे उल्लंघन असे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती आष्टा पोलिसांनी दिली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











