kini crime news : किणी टोल नाक्याजवळ आराम बसच्या धडकेत मिनीबस चालक जागीच ठार

SHARE:

kini crime news : किणी टोल नाक्याजवळ आराम बसच्या धडकेत मिनीबस चालक जागीच ठार : महामार्गाच्या कडेला थांबलेल्या मिनीबसला आराम बसने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन बसच्यामध्ये चिरडून मिनिबस चालक जागीच ठार झाला. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. लोकेश तिमय्या (वय 24, रा. बिलीकेरे, ता. होणसुर, जि. म्हैसूर, कर्नाटक) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.

kini crime news : किणी टोल नाक्याजवळ आराम बसच्या धडकेत मिनीबस चालक जागीच ठार

सहलीसाठी मुंबईला गेलेले परतत असताना झाला अपघात

पुणे-बंगळूरू महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती अशी की, कर्नाटकातील काही लोक सहलीसाठी महाराष्ट्रात आले होते. मुंबई दर्शन करून ते परत आपल्या गावी निघाले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही बस घुणकी गावच्या हद्दीत आली असता मिनिबस थांबवून चालक लोकेश तिमय्या लघुशंकेसाठी मिनीबसच्या मागील बाजूस गेला.

याचवेळी पुण्याहून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने येणार्‍या आराम बसने थांबलेल्या मिनीबसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत मिनीबसच्या मागे उभा असलेला चालक लोकेश तिमय्या हा बसच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला.

अपघात इतका भीषण होता की मिनीबसचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही वाहनांतील काही प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर आरामबस चालक घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *